विपरीत राजयोग

💢 विपरीत राजयोग 💢 💠कुंडलीच्या फलादेशाचे वर्णन करताना, आपण कुंडलीचे बारा भाव, त्यांचे कारकत्व, तसेच रवि चंद्रादि 12 ग्रह, त्यांचे भावेशत्व, त्यांच्या राशी, नक्षत्रे, अंश, नवांशगत स्थिती, त्या ग्रहावरील इतर ग्रहांच्या दृष्ट्या, त्यांनी इतर ग्रहांशी केलेले योग, याचा सर्वसाकल्याने विचार करून, आपण फलादेशापर्यंत पोहोचतो. 💠अचूक फलादेशासाठी, कुंडलीत जर काही विशिष्ट योग असले, तर त्यांची, ज्योतिषास सखोल माहिती असावी लागते. म्हणजे त्या योगाच्या संबंधित असणाऱ्या ग्रहांची, फल देण्याची क्षमता किती आहे ? हे स्पष्टपणे लक्षात येते. 💢 उदाहरणादाखल, पंचमहापुरुष योग, अमलायोग, महाभाग्ययोग, अधियोग असे कितीतरी शुभयोग सांगता ये...