Posts

Showing posts from March, 2021

मनोगत

Image
                         दोन शब्द सप्रेम नमस्कार 🙏,     💢 ज्योतिष्यशास्त्र निश्चितच अतिशय गूढ, व गहन विषय आहे.या शास्त्राचा अभ्यास करण्या साठी, प्रारब्धात तसे ग्रहयोगहि असावे लागतात. तरच या शास्त्राचा अभ्यास करण्याची उर्मी, स्वभाव सुलभ उत्सुकता, त्यास चालना देणारे मार्गदर्शन, अव्याहत चिकाटी, असे सर्व आवश्यक गुण, आपणास विविध ग्रह, त्याच्या कुंडलीतील स्थाना नुसार, स्थितीनुसार त्यांचा कल, यापासून आपल्याला मिळतात.      💢 मग, अभ्यासाचा अखंड प्रवास सुरु होतो. आपले परिश्रम, व ग्रहयोगाची साथ, आपला मार्ग अधिकच सुकर करतात. कुंडल्यातील ग्रहांची वेग वेगळी स्थिती, व तीचे आकलन करण्यात, बराच काळ जातो. " पी हळद व्हो गोरी " या तत्वाचा इथे काहीच उपयोग नसतो.        💢 पत्रिकेतील ग्रहांचे,जेवढे निरीक्षण कराल तेवढ्या, त्याच्यापासून काय फळे प्राप्त होतील ?, याच्या विविध छटा, त्यातून उमटतात. एकच पत्रिका अनेक वेळा पहा. दरवेळेस असा विस्मय कारक अनुभव येऊ शकतो. यासाठी, सखोल चिंतन फारच महत्वाचे असते. ...