मनोगत
दोन शब्द
सप्रेम नमस्कार 🙏,
💢 ज्योतिष्यशास्त्र निश्चितच अतिशय गूढ, व गहन विषय आहे.या शास्त्राचा अभ्यास करण्या साठी, प्रारब्धात तसे ग्रहयोगहि असावे लागतात. तरच या शास्त्राचा अभ्यास करण्याची उर्मी, स्वभाव सुलभ उत्सुकता, त्यास चालना देणारे मार्गदर्शन, अव्याहत चिकाटी, असे सर्व आवश्यक गुण, आपणास विविध ग्रह, त्याच्या कुंडलीतील स्थाना नुसार, स्थितीनुसार त्यांचा कल, यापासून आपल्याला मिळतात.
💢 मग, अभ्यासाचा अखंड प्रवास सुरु होतो. आपले परिश्रम, व ग्रहयोगाची साथ, आपला मार्ग अधिकच सुकर करतात. कुंडल्यातील ग्रहांची वेग वेगळी स्थिती, व तीचे आकलन करण्यात, बराच काळ जातो. " पी हळद व्हो गोरी " या तत्वाचा इथे काहीच उपयोग नसतो.
💢 पत्रिकेतील ग्रहांचे,जेवढे निरीक्षण कराल तेवढ्या, त्याच्यापासून काय फळे प्राप्त होतील ?, याच्या विविध छटा, त्यातून उमटतात. एकच पत्रिका अनेक वेळा पहा. दरवेळेस असा विस्मय कारक अनुभव येऊ शकतो. यासाठी, सखोल चिंतन फारच महत्वाचे असते.
💢 धार्मिक ग्रन्थामध्येहि,असाच अनुभव येतो. एकच श्लोक, दरवेळेस, नवीन काही सांगून जातो. अशी शास्त्राची किमया आहे. यामुळे बहुश्रुतता अधिक वाढते व त्याने अनुभव अधिकच समृद्ध होतो.
💢 म्हणून, प्रत्येक ज्योतिष्याकडे,आपण काहीतरी वेगळे शिकतो, व आपला अनुभव समृद्ध करतो.
💢 अशा अनुभवातूनच, या विषयावर विविध लेख लिहिण्याची, एखाद्या विषयांचे, माझ्या दृष्टीतून आढळलेले अंतरंग, मी ज्योतिष्यप्रेमी वाचका समोर, या माध्यमाद्वारे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
💢 नवोदित ज्योतिष्य अभ्यासकांना, त्याचा सर्वात अधिक उपयोग होईलच,अशी मला पूर्ण खात्री आहे. पण,जे सतत अभ्यास करु शकत नाहीत, तरी पण, त्यांना जिज्ञासा आहे, अशा वाचकानाहि, ते रंजक ठरेल, असा माझा सदैव प्रयत्न असतो.
💢 कुठलाहि उत्साह टिकण्यासाठी, त्याला प्रोत्साहनाचे खतपाणी असावेच लागते. त्यामुळे प्रत्येक वाचकाने, लेख वाचल्यानंतर, त्यावर मुक्त प्रतिक्रिया द्यावी, काही त्रुटी आढळल्यास, त्याहि, नि :संकोच कळवाव्यात, याचा मला आनंदच होईल.,व माझा उत्साह, अधिक वाढेल, ही नम्र अपेक्षा करून,माझे दोन शब्द संपवितो.🙏
धन्यवाद!
पुंडलिक दाते, ज्योतिष्य अभ्यासक, अकोला- 9421755299
Comments
Post a Comment