द्विभार्या योग




पत्रिकेतील " द्विभार्या  योग "


💢जेव्हा पत्रिकेत, ज्योतिषांकडे, विवाह विषयक प्रश्न विचारले असता, बरेचदा " द्विभार्यायोग " सांगितला जातो. तेव्हा, जातकाच्या मनात, चिंतेचे मळभ तयार होते. तो अतिशय चिंताग्रस्त होतो.


       अशा प्रकारच्या, बर्‍याचशा पत्रिका माझ्या पाहण्यात आलेल्या आहेत.

 त्यामुळे,  आलेल्या अनुभवानुसार, द्विभार्या योगाचे स्वरूप, कसे आहे ?, हे नमूद करणे, मला इष्ट वाटते.


💢 वरील विषय खूप गहन आहे.


💢 काही पत्रिकांमध्ये " द्विभार्या योग " असतो, जसा पुरुषांमध्ये असतो, तसाच तो  स्त्रियांमध्येहि  दिसून येतो.


💢 परंतु या योगाचे स्वरूप नीट समजून घ्यावे लागते.


💢 एखाद्या व्यक्तीने, तुम्हाला मनोमन  वरले असेल व  त्या व्यक्तीस तुम्हीहि    मनोमन वरले असेल, परस्पराची पसंती, एकमेकांना कळली असेल, अशी स्थिती असून, जर पुढे त्यास यश आले नाही, तरी ते द्विभार्या योगात मोडते.

किंवा

💢 विवाहा पूर्वी, वा क्वचित विवाहोत्तर, अशा प्रकारचे, अनैतिक संबंध सुद्धा, असू शकतात.


💢 या ठिकाणी, हे स्पष्टपणे नमूद करतो की, जीवनात कोणतीही घटना, मग ती शुभ असो की अशुभ, वैध असो की अवैध, ग्रह ताऱ्याच्या संकेतशिवाय, घडत नाही.

💢 तशाच प्रकारची, संकेतिक स्थिती दुसऱ्या, सहभागी व्यक्तीच्या, कुंडलीत असल्या शिवाय, अशा घटना घडत नाहीत.


💢 साखरपुडा, वा वागनिश्चय झाल्यावर, स्थळ फिसकटले असेल तर, तेहि  याच  योगात मोडते.


💢 या ग्रहस्थितीचा विचार करता, "जीवावरचे संकट बोटावर निभावले ", अशी भावना जागृत झाल्याशिवाय राहत नाही.



💢 बहुदा 70 % पत्रिकामध्ये  असेच घडून येते.


💢 विवाहेश जर द्विस्वभाव राशीत असेल, तर असा अनुभव, दोनदाहि  येऊ शकतो.


💢 याविषयी, खोलात जाऊन, निर्णय घ्यावयाचा असल्यास, त्या व्यक्तीचे गुरुबल, रविबल, व शुक्राची स्थिती पहावी लागते.


💢 अर्थातच, हा विषय अतिशय नाजूक असल्याने, यातील बारकावे, ज्योतिषी उलगडून दाखवीत बसत नाहीत.


💢 एका व्यक्तीस, अनेक ज्योतिष्यानी, द्विभार्या योग सांगितला होता. त्या व्यक्तीने, पत्रिका दाखवण्यापूर्वी, अत्यंत चिंतायुक्त स्वरात, तसें मला सांगितले.


💢 त्याच्या संसारात, तो खूप सुखी असावा.

💢 पत्रिका पहिली असता, द्विभार्या योग होताच.

💢 मी त्याला, त्याचे गत आयुष्य, स्पष्टपणे, न विचारता, वरीलप्रमाणे, या योगाचे स्वरूप कथन केले.


💢 ते ऐकताच, त्याचा चेहरा खुलला. मनावरील दडपण निघून गेले.


💢 मला, न विचारलेल्या प्रश्नाचे, उत्तर मिळाले होते .


💢 सप्तमेशाची अवस्था, व सप्तमातील  ग्रहस्थिती, व शुक्राची स्थिती, जर  फारच जाचक  असेल, तर प्रथम विवाह टिकत नाही. नंतर पुन्हा विवाह करावा लागतो.


💢 असे बहुरंगी स्वरूप, " द्विभार्या योगा " चे सांगता येईल. "


Comments

Popular posts from this blog

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली