कुंडली अभ्यास तंत्र व मंत्र
⚛️ कुंडली अभ्यास - तंत्र व मंत्र ⚛️ ज्योतिष्य विषयक अभ्यास करताना, आपल्याला सतत या विषयावरील वाचन करावे लागते व त्याचबरोबर, अनेक कुंडल्या पाहण्यांचा सुद्धा सराव करावा लागतो. कुंडली अभ्यासाचा सराव करताना, आपण जर योग्य मार्ग निवडला तर, आपल्याला अभ्यासात शीघ्र गती येते. ◾कुंडली मांडताना काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे ग्रहांचे स्पष्ट स्वरूप, आपल्या ताबडतोब लक्षात येते. याकरीता, मी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे. 💢 सर्वप्रथम, जन्मकुंडलीचा विचार करण्यासाठी, आपल्याला कुंडलीचा नकाशा काढून, त्यामध्ये तपशिलानुसार ग्रह भरावे लागतात. ◾ ग्रह लिहिताना, जर आपण त्यांच्या डोक्यावर जर त्यांचे अंश लिहिले तर, त्या ग्रहाची अवस्था, आपल्या पटकन लक्षात येते. किंबहुना, अंश लिहिल्याशिवाय, कुंडलीचा पुढील विचार करूच नये, असे मला वाटते. ◾ कधी कधी, काही ग्रह अस्तंगत असतात. ते चटकन लक्षात येण्यासाठी, आपण त्या ग्रहाभोवती वर्तुळ केलेले कधीही चांगले. ◾ एखादा ग्रह जर वक्री असेल तर, त्याची अवस्था दाखवण्यासाठी त्या ग्रहाच्या पायाखाली, एक विशिष्ट खूण केलेली बरी. ◾ कुंडलित बरेचदा, काही ग्रह क्रूर नक्षत्...