कलागुण व ग्रहयोग

💢 विचार मंथन : कलागुण व ग्रहयोग 💢 " 14 विद्या व 64 कला " ही शब्दोक्ती बरेचदा आपण ऐकलेली आहे . विद्येच्या तुलनेत, कलांची संख्या अधिक आहे, हेहि यावरून लक्षात येते. मानवाची दिवसेंदिवस, होत असलेली प्रगती पहाता, या दोन्ही संख्येत, निश्चित भर पडलेली आहे. ◾️जीवनात जेवढ्या विद्या व कला आत्मसात करता येतील, तेवढे व्यक्तित्व समृद्ध होते. व्यक्तीस समाजात मान- सन्मान, पद, पैसा प्रतिष्ठा प्राप्त होते, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ◾️जर कुंडलीतील धर्म त्रिकोण, कलापोषक ग्रहांनी बलवान असेल, तर असा ओढा अधिक दिसून येईल. कारण या जातकाचा, व्यक्ती विकासाकडे अधिक ओढा असतो.यात " स्वान्त सुखाय " हा भाव अधिक असतो. हवा तो गुण मिळवण्यासाठी, जीवाचे रान करण्याची त्यांची तयारी असते. ते कलेची उपासना नव्हे, तपस्या करतात. ◾️" बाळाचे पाय पाळण्यात दिसतात " ही म्हणही बहुतांशाने खरीच आहे. निसर्गतः ज्या कलेकडे व्यक्तीचा ओढा असतो त्या क्षेत्रात त्याची उत्सुकता असते. व त्या उत्सुकतेला जर योग्य खतपाणी मिळाले तर ती जोमाने फोफावते. व अंग ...