7️⃣ 💢 पंचांगाची - महती व माहीती 💢
💢 पंचांगाची - महती व माहीती 💢 ∆ पूर्वापार, वर्षानुवर्षे ,एका पिढी पासून दुस-या पिढीत ,घराघरातून उपलब्ध असणारे एकमेव पुस्तक, म्हणजे पंचांग होय. पंचांगाचे अंतरंग पाहता "गागर में सागर " या शब्दात वर्णन करणे, अगदी योग्य ठरेल. ∆ हिंदु धर्मातील संस्कार, प्रत्येकाच्या मनात खोलवर रूजावेत, या करीता सण, व्रतवैकल्ये ,याची तारीखवार, व नैमित्तिक माहिती, प्रत्येकाच्या आवडीची ठरते. महिलांसाठी तर हा विषय, अधिक जिव्हाळ्याचा असतो. ∆ पूजा - अर्चा, ग्रहांची उपासना, महत्वाचे मंत्र, बीज मंत्र आदि विषय ,आपसूकपणे, आपल्या मनावर ग्रहांचे महत्व व त्यांचा प्रभाव बिंबवतात. ∆ ज्योतिष्य विषयक ,प्रारंभिक माहीती देऊन पंचांग, नवागतांसाठी, पथ प्रदर्शन करते. दैनंदिन लग्न सारणी, स्पष्ट चंद्र कसा काढता येईल ?, दररोजचे सुर्योदय कालीन, ग्रहांच्या अंशाची कोष्टके , ज्योतिष्यांना खूप मार्गदर्शक असतात. ∆ कुठला ग्रह वर्षभरात, केव्हा राशी बदल करेल ही माहीती, विवाहेच्छूकांना तर खूपच मोलाची ठरते. महापुरुषांच्या जयंत्या, यात्रामहोत्सवाच्या तारखा, वेगवेगळे मुहूर्त, अशा बहुविध विषयाचा संग्रह , म्हणजे पंचांग ...