7️⃣ 💢 पंचांगाची - महती व माहीती 💢




💢 पंचांगाची - महती व माहीती 💢


∆ पूर्वापार, वर्षानुवर्षे ,एका पिढी पासून दुस-या पिढीत ,घराघरातून उपलब्ध असणारे एकमेव पुस्तक, म्हणजे पंचांग होय. पंचांगाचे अंतरंग पाहता "गागर में सागर " या शब्दात वर्णन करणे, अगदी योग्य ठरेल. 


∆ हिंदु धर्मातील संस्कार, प्रत्येकाच्या मनात खोलवर रूजावेत, या करीता सण, व्रतवैकल्ये ,याची तारीखवार, व नैमित्तिक माहिती, प्रत्येकाच्या आवडीची ठरते. महिलांसाठी तर हा विषय, अधिक जिव्हाळ्याचा असतो. 


∆ पूजा - अर्चा, ग्रहांची उपासना, महत्वाचे मंत्र, बीज मंत्र आदि विषय ,आपसूकपणे, आपल्या मनावर ग्रहांचे महत्व व त्यांचा प्रभाव बिंबवतात. 


∆ ज्योतिष्य विषयक ,प्रारंभिक माहीती देऊन पंचांग, नवागतांसाठी, पथ प्रदर्शन करते. दैनंदिन लग्न सारणी, स्पष्ट चंद्र कसा काढता येईल ?, दररोजचे सुर्योदय कालीन, ग्रहांच्या अंशाची कोष्टके , ज्योतिष्यांना खूप मार्गदर्शक असतात.

 

∆ कुठला ग्रह वर्षभरात, केव्हा राशी बदल करेल ही माहीती, विवाहेच्छूकांना तर खूपच मोलाची ठरते. महापुरुषांच्या जयंत्या, यात्रामहोत्सवाच्या तारखा, वेगवेगळे मुहूर्त, अशा बहुविध विषयाचा संग्रह , म्हणजे पंचांग होय. जणू काय, पंचांग म्हणजे विविध रंगी फुलांचा, गुलदस्ताच होय. 


∆ आजच्या संगणकीय युगात, वेगवेगळे साफ्टवेयर निघाल्याने, काही माहीती, झटपट मिळते खरी पण , पंचांगाची ते बरोबरी करू, शकतील कां ? याबाबत शंका आहे. 


∆ साफ्टवेयर मध्ये ,एखादी तारीख टाकल्यास, केवळ त्या तारखेची माहीती मिळेल , त्या दिवशीचे ग्रहमान मिळतील ,पण पंचांगात मात्र, एकेका पानावर, पूर्ण पंधरवाड्याची माहीती असल्याने, व दिनविशेष दिलेले असल्याने, संगणकापेक्षा अधिक माहीती मिळते. दग्ध योग , यमघंट योगादि माहीती, साफ्टवेयर मध्ये मिळणार नाही. साफ्टवेयर मध्ये खग्रास - खंडग्रास ग्रहणांचा उल्लेख नसतो, पण पंचांगावरून हे मात्र तत्काळ लक्षात येते. जन्मदिवशी , खग्रास चंद्रग्रहण असता, व पत्रिकेत जर चंद्र दूषित झाला असेल, तर बालक, मंदबुध्दी वा मानसिकदृष्टया अपंग , जन्माला येऊ शकते . जेव्हा कुंडली बनवितांना, पंचांगाचा आधार घ्याल , तेव्हाच ही गोष्ट लक्षात येऊ शकते. साँफ्टवेअरमध्ये ते शक्य होत नाही. हा साँफ्टवेअर व पंचांगात लक्षणीय फरक आहे. 


∆ प्रत्येक प्रदेशात, एकेका विशेष पंचांगाचे, चलन पहावयास मिळते कारण, त्या पंचांगात दिलेली माहीती, त्या प्रदेशातील, एका प्रमुख शहरांच्या अक्षांश - रेखांशावर, आधारित असते त्यामुळे,  त्या प्रदेशात राहणा-या लोकांना ते, अधिक सोयीचे होते.

 

इतर शहरात जन्म झाल्यास , त्या पंचांगावरून कुंडली काढतांना, वेळ संस्कारित करून घ्यावी लागते. 


∆ पंचांग म्हणजे कँलेंडर , असाहि काहींचा गैरसमज असू शकतो. पण पंचाग ,कँलेडरपेक्षाहि ,आपले वेगळे अस्तित्व, सिध्द करते. 


∆ आज उपलब्ध असलेले पंचांग, त्यामानाने , खूप प्रगत अवस्थेत आहे. मला एके ठिकाणी, खूप जुने पंचांग पाहण्याचा योग आला. ते मोडीत छापलेले होते. त्यावरील शक इसवी सनात रुपांतर केले असता, ते सन 1858-59 चे आहे हे लक्षात आले. पंचांगाच्या शेवटच्या पानावर " हे पंचांग..... यांनी मुंबई येथे छापि ले " असा शब्द तोडून, बखरी भाषेत, उल्लेख होता. पंचांगाची पाने पिवळीजर्द व निर्जीव झालेली होती. उलगडून बघतांना, त्यांचा तुकडा पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागत होती. शेवटच्या पानावर ,संक्रातीदेवीचे त्या पंचांगातील, एकमेव चित्र होते.


∆ पूर्वीच्या काळी ,पंचांगे, मोडी लिपीत प्रसिध्द होत असत. त्यात दैनंदिन ग्रहाच्या माहीती व्यतिरिक्त, अन्य पूरक माहीती, काहीहि नसायची. पंचांगात केवळ 7 ग्रहांचा उल्लेख असायचा. कालांतराने राहू- केतू चा समावेश झाला. अलीकडच्या काळात हर्षल ,नेपच्यून, प्लूटो यांची , राशीनिहाय माहीती उपलब्ध होत आहे. त्यावेळी केवळ ,मराठी महीने, ताऱखांचा उल्लेख असायचा. नामाभिधान सुध्दा शक-संवताआधारे केले जायचे. इसवी सन वा इंग्रजी महीने , तारखा, यांना मज्जाव केला जाई. तिथि -नक्षत्रांचा समाप्ती काल, तर आता-आता पर्यंत , घटका -पळात , छापलेला असे. पण आता बदलत्या काळाची गरज ओळखून, सरलीकरणाच्या दृष्टीने, सर्व वेळा तास मिनिटात , देण्यात येतात. 

असे हे बहुगुणी, बहुआयामी, पंचांग प्रत्येक ज्योतिष्यप्रेमीच्या संग्रहात असलेच पाहिजे. 


∆ वर्ष संपले तरी, त्या पंचांगाचे महत्व कमी होत नाही. संग्रहात ठेवल्यास, भूतकाळातील संदर्भाकरीता, ते सदैव मदतीस तयार असते.


                   

व्हाट्स अप -9421755299 

Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली