Posts

Showing posts from January, 2022

अष्टमस्थान व 64 वा नवांश

Image
                         💢 अष्टमस्थान व 64 वा नवमांश 💢 कुंडलीच्या 12 भावातील प्रत्येक स्थानांस एक आगळेवेगळे महत्त्व आहे . 6, 8, 12 त्रिकस्थानांपैकी , अष्टमस्थान हे एक अशुभ मानले जाणारे स्थान आहे . या स्थानापासून मृत्यूतुल्य संकटे , चिंता , आजार , गुप्तरोग , सासर , सौभाग्य , सदसद्विवेक बुद्धी , वारसाहक्काने धनलाभ , विना परिश्रमाची संपत्ती ,  अ कस्मात धनलाभ या बाबी प्रामुख्याने पाहिल्या जातात . या स्थानातून मिळणाऱ्या धनाचा स्त्रोत , मात्र अशुभ असतो . 💢 अशा या अष्टमस्थानाच्या महात्म्यामुळेच , अष्टमेश वा अष्टमस्थानात स्थित असलेल्या ग्रहांच्या दशा - अंतर्दशा जरा खडतरच जातात . 💢 या स्थानाचे कारकत्व शनि महाराजांकडे आहे . अष्टमात शनी असता, व्यक्ती   दीर्घायुषी असते . फक्त तो बलवान हवा . हार्ट अटॅकच्या प्रसंगात , जर अष्टमात शनी असेल तर, पहिल्या अटॅकपासून बचाव होतो . अशा प्रकारच्या 2 /3 कुंडल्या माझ्या संग्रही आहेत . थोडक्यात, या शनीमुळे झटक्यात मरण न येता , बरेच दिवस बेडवर रेंगाळत राहून मरण य...