पितृऋणमुक्ती -संतानप्राप्ती
💢 पितृ ऋणमुक्ती संतानप्राप्ती 💢 व्यक्तीने गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर त्याची पुढची पायरी म्हणजे संतान प्राप्ती होय . आपण ज्या कुळात जन्म घेतो . त्या कुळाचे नाव , पुढे पिढ्यान पिढ्या चालू राहावे यासाठी , आपण त्या कुळास संतती उत्पत्ती करून वारसदार द्यावा म्हणजे पितृऋण फेडले जाते , अशा प्रकारची धारणा असल्याने , जोपर्यंत संसार वेलीवर फूल उमलत नाही तोपर्यंत , व्यक्तीस समाधान लाभत नाही . स्त्रियांच्या बाबतीत मातृत्व हा त्यांचा हक्क असल्याने जोपर्यंत , मातृत्वाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत , जणू जन्मच सफल झाला नाही . अशी स्त्रियांची भावना असते . त्यामुळे घरात , जोपर्यंत पाळणा हलत नाही तोपर्यंत , कुटुंबात समाधान नसते . थोडक्यात , संततीप्राप्ती हा जीवनातील एक महत्त्वाचा योग आहे . विवाहासाठी गुणमेलन करतांना , ...