क्रूर नक्षत्री ग्रह व अभुक्त मूळ

⚛️ क्रूर नक्षत्रातील ग्रह व अभुक्त मूळ ⚛️ आपल्या क्रांतीवृत्ताच्या कक्षेत 12 राशी, तसेच 27 नक्षत्रे येतात. प्रत्येक नक्षत्राचे वैशिष्ट्य हे वेगवेगळे आहे. एका राशीत एकंदर 9 चरणे असल्याने व एका नक्षत्रात 4 चरणे असल्याने, सव्वा दोन नक्षत्र मिळून एक राशी बनते. अवकहडा चक्रात पाहिले असता, काही नक्षत्रांची काही चरणे एका राशीत व काही चरणे, दुसऱ्या राशीत येतात. या नक्षत्रचक्रात काही नक्षत्रे, क्रूर मानली गेली आहेत. जसे मेष राशीत अंतिम चरणी सुरू होणारे कृतिका नक्षत्र वृषभेचे प्रथम 3 चरण घेऊन संपते. त्यानंतर मिथुनेतील आर्द्रा नक्षत्र, कर्केतील आश्लेषा नक्षत्र, सिंह राशीचे मघा नक्षत्र, वृश्चिक राशीतील ज्येष्ठा नक्षत्र व धनु राशीतील मूळ नक्षत्र यांचा प्रामुख्याने समावेश होतो. 💢 त्यात मूळ नक्षत्राचे आगळे वेगळे वैशिष्टय म्हणजे हे " नपुसक " नक्षत्र आहे. धनु राशीत, गुरु मूळत्रिकोण राशीत असतो. त्यामुळे गुरु राशींबली असल्याने, गुरु ज्या भावात असेल, तो भाव बलवान मानला जाईल. पण तो जर धनु राशीत, 13 अंश 20 कलेच्या आत असेल, तर...