Posts

Showing posts from April, 2023

राखावी बहुतांची अंतरे -धनयोग

Image
          ⚛️राखावी बहुतांची अंतरे – धनयोग ⚛️  जीवनात सर्व काही पैसाच आहे असं नाही पण त्याचबरोबर, पैशाशिवाय काहीही होत नाही. व्यक्ती तर श्रीमंत असेल तरच, तिला समाजात मान प्राप्त होतो." सर्वे गुण : कांचनमाश्रयते ", " पैशापाशी पैसा जातो ". नो मनी, पुसेना कोणी "अशा संकरीत भाषेतल्या म्हणीहि, पैशाचे महत्व पटवून देतात. ◾️ धनसंग्रह, वडिलोपार्जित धन, स्कॉलरशिप द्वारे मिळणारा पैसा, विद्याबक्षीसे, हे द्वितीय स्थानाचा स्वामी, व द्वितीयात असणारे ग्रह, यावरून पाहिले जाते. ◾️पण त्याचबरोबर, हे वाणीचेहि स्थान असल्याने, आपण संभाषणात वापरलेले शब्द, हे सुद्धा एक प्रकारचे धन होय. कारण, या शब्दधनामुळे, माणसे जोडली  जाऊ शकतात. शब्द हे मनातील भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. त्यामुळे, सुसंवाद वा कुसंवाद हा विषयहि तेवढाच महत्त्वाचा आहे, असे मी मानतो.  ◾️धनस्थानात जर पापग्रह असतील, व धनेशहि अशुभस्थानात असेल तर, त्या जातकाची वाणी, धनात्मक, प्रभावशील राहत नाही.  ग्रहांच्या कारकत्वानुसार, जर धनेश रवि धनस्थानातच असेल तर, जातकाचा आवाज खणखणीत असून, त्यात अधिकाराची जरब असते. ...