कोण श्रेष्ठ
5️⃣3️⃣ एक प्रश्न :- ज्योतिष्य विषयक लेख लिहिणारा श्रेष्ठ ? की भविष्य वाणी लिहिणारा ? उत्तर :- दोन्ही करिता अभ्यास, साधना,व अनुभव आवश्यक आहेत. भविष्य कथनात भविष्यवाणी होईल. पण लेख लिहिताना, भाषा शुचिता, प्रतिपादन शैली, विषयाची मांडणी. विषय स्पष्ट करण्यासाठी समयोचित उदाहरणे, सर्व सामान्यांचे, त्या विषयावरील उत्सुकतेचे शमन, अशा विभिन्न बाबींची पूर्तता करावी लागते. त्यामुळे, या विषयावरील लेखनही, तितकेच महत्वाचे आहे. 💢 ज्ञान हे ज्ञानच असते, मग तें कुठल्याहि माध्यमातून असो. 💢 दुसरी अत्यन्त महत्वाची गोष्ट : कधीहि, कुणाला कमी लेखु नये. 💢 याबद्दल एक बोधपर कथा आहे. 💢 एकदा एक, प्रकांड पंडित, एका गावी प्रवचनाचा कार्यक्रम आटोपून, दुसऱ्या गावी चालला होता. वाटेत खूप मोठी नदी असल्याने, तो होडीत बसला. त्याच्यासोबत, फक्त नावाडी होता. दीड दोन तासाचे अंतर, नावेने कापायचे होते. बसल्या -बसल्या, याचे मनात," माझा केवढा सत्कार...