Posts

Showing posts from February, 2024

योग बुध -मंगळाचे, प्रस्तावना

 ⚛️ योग बुध मंगळाचे ⚛️ 💢 वैदिक ज्यो.शास्त्रात बुध व मंगळ एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जातात. बुध म्हणजे बुद्धी व मंगळ म्हणजे शोर्य, धाडस होय. बुध व मंगळ या दोघांची युति वा दृष्टियोग असता, जातकात हट्टीपणा, जिद्द, आपलेच म्हणणे खरे करण्याचा अट्टहास, आपण ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणे., मग ते पूर्ण करण्यासाठी वैध /अवैध मार्गाचा अवलंब करणे, पुढच्या परिणामांचा विचार न करणे. समाज काय म्हणेल याचा फारसा विचार न करणे अशी स्वभावाची ठेवण असते. बुध वाणीचा कारक असल्याने, टोचून बोलणे, वर्मी लागेल असे बोलणे यांच्या स्वभावात दिसते. 💢 तीव्र स्मरण शक्ती, गणितात, संगणक क्षेत्र, इलेट्रॉनिकस या विषयात यांना उत्तम गती असते हा या युति, दृष्टी्योगाचा शुभ परिणाम म्हणावा लागेल. 💢 पत्रिकेला रविबल, गुरुबल असेल तर हा स्वभाव थोडा नियंत्रणात राहू शकतो. या दोन्ही बलाचा अभाव असल्यास, अतिशय तीव्र परिणाम मिळतात. 💢 त्यातून हा योग क्रूर नक्षत्रात झाला असेल, तो अंशात्मक स्थितीत असेल तर, फार दाहक परिणाम मिळतात. तसेच हा युतीयोग, वा दृष्टियोग शनीच्या दृष्टीत असेल तर अधिक वाईट परिणाम देतो. 💢 या दृष्ट...