Posts

Showing posts from June, 2025

कथा -64 व्या नवांशाची

Image
 💠आपल्या जन्माचा तपशील, म्हणजे जन्मतारीख, जन्मवेळ व जन्मस्थळ हा जर सुनिश्चित असेल तर,जन्म कुंडलीत, आपल्या जन्मवेळी, आकाशातील ग्रहांची राशीनिहाय काय स्थिती होती, हे आपल्याला कळते. व त्यावरून, आपल्याला भविष्यात काय घडेल, याचा  स्थूल अंदाज ज्योतिषाकडून वर्तविला जातो. 💠" स्थूल अंदाज" हा शब्द एवढ्याच साठी मी वापरला आहे की,ज्योतिष्य हे खूप गहन शास्त्र आहे. व जन्म कुंडली ही त्याची प्रथम पायरी आहे. जन्म कुंडलीतील ग्रह हे कसे फळ देऊ शकतात,? त्यांचे बळ पाहण्यासाठी नवाश कुंडली विशेष महत्त्वाची ठरते. जन्म कुंडलीच्या जोडीला, जर नवाश कुंडलीचा आधार घेतला तर, केलेले अंदाज हे बरेचसे वास्तवदर्शी असतात. त्यामुळे, जन्म कुंडली बरोबरच, नवाश कुंडली पण पहाणे फार जरुरी असते. 💠 नवाश कुंडलीचा 64 वा नवाश, हा फार घातक मानला जातो. हा 64 वा नवांश, नवांश कुंडलीच्या  अष्टमस्थानाचा प्रथम नवांश असतो. अष्टमस्थान हे अशुभ व मृत्यूस्थान मानले आहे. त्यामुळे, आपल्या मृत्यूतुल्य संकटाच्या वेळी, अथवा आपण अपघातग्रस्त असताना, किंवा,आपले एखादे क्रिटिकल स्वरूपाचे ऑपरेशन होत असताना, गोचरीने येणारा एखादा ग्रह,जर 64 व...