⚛️ ज्योतिष रत्न भाग एक अभ्यासक्रम ⚛️ ◾ मुख्य प्रबंध - यासाठी आपल्याला एकूण सात विषय दिलेले असून, ते याप्रमाणे आहेत 1. कोर्ट केस 2. नि: संतान योग 3. परित्यक्तता योग 4. ऑपरेशन योग 5. त्वचा विकार 6. अविवाहित व्यक्ती 7. घटस्फोटीत /ता ◾यातून आपल्याला फक्त पाच विषय निवडायचे आहेत. व निवडलेल्या प्रत्येक विषयाच्या दहा कुंडल्या,अशा एकूण पन्नास कुंडल्यांचा, हा प्रबंध आपल्याला परीक्षा हॉलवर सादर करावयाचा आहे ◾ लघु प्रबंध - हा प्रबंध एकूण पाच कुंडल्यांचा असून, त्याकरता आपल्याला अशा व्यक्ती निवडायच्या आहेत., की, ज्यांच्या कुकर्माने, सार्वजनिक जीवन ढवळून निघाले आहेत. व त्यामुळे ते खूप अपप्रसिद्ध झालेले आहेत. व त्यांच्या या कृतीमुळे राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय इतिहासात त्याचे नोंद झालेली आहे. अशा व्यक्तीचा जन्म तपशील त्याच्या कुंडलीतील ग्रहयोग, ती व्यक्ती अशा कुकर्मास का कारणीभूत झाली, याचे ज्योतिष शास्त्रीय विवेचन, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून चंद्र कुंडली,नमांश कुंडली, वर्ग कुंडल्या याचे पण आपणास अभ्यासपूर्ण विवेचन करावयाचे आहे. अर्थात अशा कुप्रसिद्ध व्यक्तींचा तपशील, आपण नेटवरून स्वतः गोळा क...