ज्योतिष रत्न भाग एक अभ्यासक्रम
⚛️ ज्योतिष रत्न भाग एक अभ्यासक्रम ⚛️
◾ मुख्य प्रबंध - यासाठी आपल्याला एकूण सात विषय दिलेले असून, ते याप्रमाणे आहेत 1. कोर्ट केस 2. नि: संतान योग 3. परित्यक्तता योग 4. ऑपरेशन योग 5. त्वचा विकार 6. अविवाहित व्यक्ती 7. घटस्फोटीत /ता ◾यातून आपल्याला फक्त पाच विषय निवडायचे आहेत. व निवडलेल्या प्रत्येक विषयाच्या दहा कुंडल्या,अशा एकूण पन्नास कुंडल्यांचा, हा प्रबंध आपल्याला परीक्षा हॉलवर सादर करावयाचा आहे
◾ लघु प्रबंध - हा प्रबंध एकूण पाच कुंडल्यांचा असून, त्याकरता आपल्याला अशा व्यक्ती निवडायच्या आहेत., की, ज्यांच्या कुकर्माने, सार्वजनिक जीवन ढवळून निघाले आहेत. व त्यामुळे ते खूप अपप्रसिद्ध झालेले आहेत. व त्यांच्या या कृतीमुळे राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय इतिहासात त्याचे नोंद झालेली आहे. अशा व्यक्तीचा जन्म तपशील त्याच्या कुंडलीतील ग्रहयोग, ती व्यक्ती अशा कुकर्मास का कारणीभूत झाली, याचे ज्योतिष शास्त्रीय विवेचन, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून चंद्र कुंडली,नमांश कुंडली, वर्ग कुंडल्या याचे पण आपणास अभ्यासपूर्ण विवेचन करावयाचे आहे. अर्थात अशा कुप्रसिद्ध व्यक्तींचा तपशील, आपण नेटवरून स्वतः गोळा करावयाचा आहे. अशा व्यक्ती, अतिरेकी सुद्धा असू शकतात, हुकूमशहा सुद्धा असू शकतात. किंवा समाजात कुकृत्ये करून बदनाम सुद्धा झालेल्या असू शकतात. केव्हा सभ्यतेचा बुरखा पांघरून, त्या आड कुकर्म करणारे, व ते चव्हाट्यावर आल्यावर, बदनाम होणारे, अशा व्यक्ती.( मग ती व्यक्ती कदाचित देशातील असेल अथवा परदेशातील ही असेल.) अशा पाच कुंडल्यांचा आपल्याला एक वेगळा लघु प्रबंध परीक्षा हॉलवर सादर करावयाचा आहे ( आवश्यकता वाटल्यास, हा लघु प्रबंध, परीक्षेच्या अगोदर सुद्धा मागविला जाऊ शकतो )
◾ वरील दोन प्रबंधा व्यतिरिक्त, आपण या अगोदर, संस्थेच्या जेवढ्या परीक्षा दिलेल्या आहेत, त्याचा अभ्यासक्रम सुद्धा या परीक्षेत अंतर्भूत असणार आहे.
याव्यतिरिक्त -
💠राहू ग्रहाविषयी माहितीचे आ.मॅडमने प्रसारित केलेले व्हिडिओ
◾ कर्तुत्ववान सामर्थ्यवान राहू असतो मोठा बलवान
◾ पत्रिकेतील राहूचे स्थिती घडवून आणते सर्वांगीण उन्नती ◾ कारक शुभ- अशुभ योगांचा,राहूमुळे काया पालट जीवनाचा ◾ राहूची दृष्टी आणि युती शुभ अशुभ फळांचे प्राप्ती ◾ केतूचे महत्त्व
💠 माझा जन्म याच राशीत का झाला -( प्रत्येक राशीनुसार प्रसारित झालेले एकूण बारा व्हिडिओज )
💠 राशी वर्णन - मिन ते मेष या बारा राशींचे, यातक स्त्री असेल तर /पुरुष असेल तर- असे एकूण, प्रसारित केलेले 24 व्हिडिओज
💠 जे जे पद्धती -( निम्नलिखितआ. मॅडमचे प्रसारित व्हिडिओ )
◾ अलौकिक जे जे पद्धती चमत्कारिक अनुभवांची प्राप्ती ◾ जातकाचे प्रश्न कसे ओळखावेत ◾ लग्नाच्या स्थानानुसार फळ मेष व वृषभ लग्न ◾ लग्नाच्या स्थानानुसार फळ मिथुन व कर्क लग्न ◾ सिंह व कन्या लग्न ◾ तूळ व वृश्चिक लग्न ◾ धनु व मकर लग्न ◾ कुंभ व मीन लग्न ◾ मीन ते मेष स्थानानुसार फळ ◾ लग्नेश आणि प्रश्नांचा कारक एकच असेल तर ◾ मेष लग्नाचा लग्नेश जर कारक ग्रह असेल ◾ वृषभ लग्नाचा लग्नेश ◾ मिथुन लग्नाचा लग्नेश ◾ कर्क लग्नाचा लग्नेश ◾ सिंह लग्नाचा लग्नेश
= पुंडलिक दाते, अकोला
Comments
Post a Comment