ग्रहयोग व सर्वाष्टक
💢 ग्रहयोग व सर्वाष्टक 💢 💠 आजार व ग्रहयोग 💠 💢आपण आता, एका स्त्री जातिकेच्या, कुंडलीचा विचार करणार आहोत। या जातिकेच्या, ऐन तारुण्यामध्ये, कमरे खालचा भाग, एकाएकी लुळा पडला. तिच्या या व्याधिच्या निरसनार्थ, कुटुंबियानी सर्व प्रयनाची परिसिमा केली। सुमारे साढ़ेसात- आठ लाख रुपये, तिच्या स्वास्थ्यावर खर्च केला। परंतु, नेमके असे कशामुळे झाले? याचे कारण कळू शकले नाही. तसेच कुठल्याही औषधिचा, तिला गुण आला नाहीं। त्या व्याधिमुळे, सुमारे सात ते आठ माहिने ती बेड्वरच होती. व एके दिवशी,व्याधिग्रस्त असताना, तिचा करुण अंत झाला. 💢 वरील स्थितीची माहिती मिळाल्यानंतर, या जातिकेचे नेमके ग्रहमान काय होते ? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली। व एक अभ्यास या दृष्टीने, तिच्या जन्म तपशिल व मृत्युचि तिथि मिळाल्यानंतर, तिच्या कुंडलीचा विचार करण्यात आला। 💢 हे कर्क राशिचे लग्न असून, लग्नबिंदु आश्लेषा या नक्षत्री होता है। लग्नेश चन्द्र, सप्तम स्थानात निर्बल राशि 14 अंशावर असून, त्याच्यासोबत चतुर्थेश व लाभेश असलेला शुक्र, 9 अंशावर होता । त्याचप्रमाणे अनपेक्षित अडचणी ...