ग्रहयोग व सर्वाष्टक
💢 ग्रहयोग व सर्वाष्टक 💢
💠आजार व ग्रहयोग 💠
💢आपण आता, एका स्त्री जातिकेच्या, कुंडलीचा विचार करणार आहोत।
या जातिकेच्या, ऐन तारुण्यामध्ये, कमरे खालचा भाग, एकाएकी लुळा पडला. तिच्या या व्याधिच्या निरसनार्थ, कुटुंबियानी सर्व प्रयनाची परिसिमा केली। सुमारे साढ़ेसात- आठ लाख रुपये, तिच्या स्वास्थ्यावर खर्च केला। परंतु, नेमके असे कशामुळे झाले? याचे कारण कळू शकले नाही. तसेच कुठल्याही औषधिचा, तिला गुण आला नाहीं। त्या व्याधिमुळे, सुमारे सात ते आठ माहिने ती बेड्वरच होती. व एके दिवशी,व्याधिग्रस्त असताना, तिचा करुण अंत झाला.
💢 वरील स्थितीची माहिती मिळाल्यानंतर, या जातिकेचे नेमके ग्रहमान काय होते ? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली। व एक अभ्यास या दृष्टीने, तिच्या जन्म तपशिल व मृत्युचि तिथि मिळाल्यानंतर, तिच्या कुंडलीचा विचार करण्यात आला।
💢 हे कर्क राशिचे लग्न असून, लग्नबिंदु आश्लेषा या नक्षत्री होता है। लग्नेश चन्द्र, सप्तम स्थानात निर्बल राशि 14 अंशावर असून, त्याच्यासोबत चतुर्थेश व लाभेश असलेला शुक्र, 9 अंशावर होता । त्याचप्रमाणे अनपेक्षित अडचणी आणणारा प्रजापती, 5 अंशावर असून, शून्य अंशेवर असलेला, भ्रम, गोंधळ, फसवणूक करणारा नेपच्यून, वर्गोत्तम अवस्थेत होता । ◾ द्वितीयेश रवि, शत्रुस्थानी, मूल या नक्षत्री, 8 अंशवर असून, त्याच्यासोबत पंचमेश और दशमेश असलेला मंगळ, अस्तंगत अवस्थेत 24 अंशावर असून, शत्रुस्थान और व्ययेश असलेला बुध, हा पण 25 अंशावर होता । तसेच, कष्टस्थानी असलेले, स्वराशीचे गुरु महाराज, हे पण मुळ नक्षत्रात् असुन, ते भाग्याचे पण स्वामी आहेत ◾ सप्तमेश व अष्टमेश असलेले शनि महाराज, अष्टमातच असुन, ते अष्टमस्थान बलवान करीत होते ◾ पराक्रम व भाग्य स्थानातिल राहू -केतु वर्गोत्तम अवस्थेत असुन, ते 29 अंशावर होते।
कुंडलीची प्रमुख वैशिष्ट्ये - ◾ लग्नेश निर्बल व प्रजापति नेपच्यूनयुक्त असणे, तो शनि मंगलाच्या पापकर्तरीत असणे। ◾ या उलट, अष्टमस्थान मात्र बलवान असणे ◾ कष्टस्थान सुद्धा बलवान असणे ◾ व्ययस्थान सुद्धा व्ययेशाची दृष्टी असल्यामुळे, बलवान असणे। ग्रहस्थिती प्रगतिस मारक ठरते ◾ व्ययेश बुध कष्टेश गुरुसोबत कष्ट स्थानी असणे, म्हणजेच आरोग्यावर खर्च होणे, याचा संकेत आहे ◾ लाभस्थानतिल मांगळ व बुध यांची असणारी अंशात्मक युति, त्वचाविकार देणारी आहे. अर्धे शरीर बधिर झाले, म्हणजे त्वचेची संवेदना गेली. हा मंगळ बुधाचा प्रभाव आहे. ◾ कष्टस्थानी जर रवी असेल तर, रवी ज्या राशित आहे, त्या राशिने दर्शविलेला भाग, हा रोगी असतो व धनु राशि मांड्यांचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे, कमरेखालील व्याधिस तो पोषक ठरतो ◾ कष्टेश गुरु कष्टस्थानी असून, तो मूळ या क्रूर नक्षत्र असल्यामुळे, चरबीची अकारण, रक्तात गुठल्या होणे, वाढ, लिव्हर खराबी, कविळ, अशा प्रकारचे आज़ार देतो। शरीरातील नसांमध्ये कुठे गाठी तयार झल्यास, रक्त प्रवाहात अडथळा येऊन, अर्धांगवायु होण्याची शक्यता असते। ◾ कष्टस्थान हे शरीराचे, ओटिपोट समजले जाता ◾ तर सप्तमस्थान हे वैवाहिक सुख, लिंग, शरीरच्या कमरेखालचा भाग आहे.◾ सप्तमाचा स्वामी जर अष्टमात असेल, तर तो वैवाहिक सुखास विघातक व मृत्युतुल्य दुःख देणारा ठरतो ◾ अष्टमात बलवान शनि असेल, तर व्यक्ति एकाएकी जात नाही. बरेच दिवस बेडवर राहून, खितपत पडून नंतर निधन होते.◾ शनिला सुद्धा, अर्धांगवायुचा कारक समजतात्। हे शनि महाराज अष्टमात असल्यामुळे, त्यांची स्थिती या व्याधिस पोषक ठरते.
💢 जेव्हा कष्टेश कष्टस्थानातच असून, त्याचे सोबत जर अष्टम वा व्ययभावाचा स्वामी असेल तर, "विपरीत राजयोग" होतो। या राजयोगाचे फल असे की, जातकाच्या जीवनात अनेक संकटे आली तरी, तो त्या विरुद्ध झगड़तो व शेवटी, त्यातून त्याला विजय मिळतो। परंतु झगडण्यात मात्र, अधिक शक्ति खर्च होते. ◾परन्तु या योगाचे फल मिळण्यासाठी लग्नेश मात्र बलवान असायला पाहिजे। या कुण्डलित हा योग होत असला तरी, लग्नेश चन्द्र मात्र निर्बल असल्यामुले, या राजयोगाचे फल, या जातिकेला मिळाले नाहीं।
💠अष्टक वर्गातील गुणानुसार , जातिकेच्या लग्नस्थानी 27 गुण असून, विवाहस्थानात फक्त 16 गुण आहेत.◾ कोणत्याही भावात जर 28 वा त्यापेक्षा अधिक गुण असतील तर, तो भाव बलवान समजला जातो. यानुसार विवाहस्थानी 16 गुण, हे खूप कमी असल्यामुळे, हिच्या विवाह सुखात बाधा येईल, हे स्पष्ट होते। ◾ विवाहाचा कारक शुक्र, हा प्रजापती-नेपच्यूनने युक्त असणे, शुक्रमागे मंगळ असने, हे सुद्धा वैवाहिक जीवनात असमाधान दर्शवते ◾ चंद्र शुक्र युतियोग अस्ता, विरहयोग होतो। अकाल मृत्युमुळे, या ठिकाणी कायमचा विरहयोग निर्माण झाला असे म्हणावे लागेल.
💠, अशा वेळेला जोडीदाराच्या पत्रिकेत सुद्धा, हमखास, विरहयोगास पोषक अशी स्थिती असते.◾ जोडीदाराची, कुंडली आपल्याकडे नसल्यामुळे, आपण त्याचे विवेचन करु शकत नाहीं.
◼️ज्या दिवशी, जातिकेस मृत्यु प्राप्त झाला, त्या दिवशीची गोचरकुंडली प्रमाणे, मुळ लग्नेश चंद्र व अष्टमेश शनि हे अष्टमस्थानातच विद्यमान होते ◾ मुळ कुंडलील रवि -मंगळ- बुध, यावेळी पंचम स्थान असून, रवि 4 अंशवर व मंगल 3 अंशवर होता ◾ शनि मंगल, एकमेकास पहात होते, त्यापकी शनि 6 अंशावर व मङ्गल 3 अंश असुन, ◾ मुळ लाभेश गुरु दशम स्थानी असुन, तो स्वस्थानास पहात आहे। ◾ थोडक्यात, याही कुण्डल लग्नेश चन्द्र, अष्टमस्थानात शनी समवेत होता.
💠एकंदरीत ग्रहस्थितीच्या विचार केला असता, जातिकेस अशा प्रकार आजार का झाला? याची कारण स्पष्ट होतात. या लेखासोबत जन्म कुंडली और गोचर कुंडली चित्र दिलेले असुन, या कुंडलीचे वीडियो रूपांतरण https://hakhelnashibacha.blogspot.com या ब्लॉगवर उपलब्ध आहे.
= पुंडलिक दाते, ज्योतिष रत्न, अकोला
9421755299.
Comments
Post a Comment