ओळख तृतीय भावाची

 

5️⃣7️⃣

💢 ओळख तृतीय भावाची  💢

मी आहे तृतीय भाव, 

बंधुभावहि,  माझेच नाव, 

धैर्य, पराक्रमे , मी परिचायक,
छंद, चिकाटी, अक्षर दर्शक  !! 1 !!

बंधू -शेजार, सुखाचा स्वामी,
हात -कान, उजवा, दर्शवी मी,
प्रवास छोटे घडविण्यासि,
माझी करावी, खोल चौकशी  !! 2 !!

जीविके साधनी, पहावे मजला ,
शुभस्थिती असता, संतोष मनाला ,
अशुभ असता, ढोर मेहनत,
परि पराक्रमाचे, होई , " पानिपत  "!! 3 !!

भाव -भावेश जव,  शुभ सर्वत्र,
बंधू सुख जणू, राम -सौमित्र,
अशुभ असता, मी सर्वही,
बंधू, बंधुला , पाण्यात पाही,  !! 4 !!

मी, अष्टमाचे, अष्टमस्थान,
या काजे, मज,  अशुभ मान,
उपाय यासी,  काही नसे,
असता प्राक्तनी, अजब ठसे  !! 5 !!


Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली