थोडेसे शुक्राविषयी :-

थोडेसे शुक्राविषयी :- 💢 शुक्र हा शुभ स्त्री ग्रह असून सौदर्य, कला, संगीत, मनोरंजन, रसग्रहणक्षमता याचा कारक असणारा, रजोगुणी ग्रह आहे. शुक्रास भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले आहे. 💢 शुक्राच्या अखत्यारीत कोणते व्यवसाय वा क्षेत्रे येतात ? हे एका वाक्यात सांगावयाचे झाल्यास, " मनुष्य जीवन यापन करण्यासाठी, आवश्यक असणाऱ्या, सर्व वस्तू खरेदी करून झाल्यावर, पैसे उरल्यास, ज्यासाठी आनंदाने खर्च करतो, त्यास सर्व वस्तू वा क्षेत्रे, शुक्राच्या अधिपत्यात येतात. " कारण पैसा कमावतो तो कशासाठी ? तर सुखोपभोग घेण्यासाठी. व्ययस्थान हे उपभोगाचे स्थान. म्हणून फक्त शुक्रालाच बारावे स्थान मानवते, असे म्हटले जाते. त्यामुळे सर्व शौकाच्या वस्तू शुक्राच्या अधिपत्यात येतात. यातहि स्त्रियांना लागणाऱ्या, सर्व वस्तूचा भरणा अधिक असतो. उदा. कापड, बांगड्या, गजरे, फुले, अत्तरे, रत्ने, अलंकार, कोस्मेटिक्स, फर्निचर, वाहन, सहलीसाठी प्रवास, गायन, वादन, नृत्य, अभिनय, सिनेमा जगतातील व्यवसाय, शृंगारिक साहित्य निर्मिती, टी. व्ही विक्रीचे शो रूम, आईस्क्रीम, कोल्डड्रिंक्स , खाद्य पदार्थ विक्री व्यवसाय, रेस...