वैवाहिक सुख

वैवाहिक सुख ( प्रसारित भाषण झूम अँप द्वारा, यु ट्यूब वर दिनांक 7 मे 2021, वेळ दुपारी 4 ते 6 ) सर्व प्रथम विद्येची देवता श्री गणेश व वाग्देवी, माता सरस्वती, यांचे स्मरण व त्यांना नमन करून, मी प्रतिपाद्य विषयास आरंभ करतो . 💢 वैवाहिक सौख्य हा सर्वांच्या उत्सुकतेचा विषय आहे. 💢 जन्म, विवाह, मृत्यू, हे जीवनातील तीन, महत्वाचे सोहळे आहेत. जन्मवेळी, जन्म, कसा साजरा केला गेला ? हे आपल्याला कळत नसते. म्हणून , त्याचा आनंद आपण उपभोगू शकत नाही. मृत्यू नंतर, काय सोपस्कार केले गेले ? हेहि आपल्या पश्चात असल्याने, आपणास कळू शकत नाही. फक्त विवाह, हाच एक असा, आनंद दायी- सुखकारक सोहळा आहे, कि तो, “ याची देही याची डोळा “ , आपण अनुभवू शकतो. 💢 विवाह म्हणजे, जीवनात वसंत फुलवणारी घटना . विवाह म्हणजे स्त्री पुरुषाचे , समाज मान्य, अधिकृत मिलन. भारतीय संस्कृती प्रमाणे, सोळा मुख्य संस्कारा तील, विवाह हा एक पवित्र संस्कार आहे. हा विवाह सोहळा एकदाच व्हावा. व त्याने, आपला गृहस्थ...