जातकाचे स्वरूपाबाबत
" लग्नेश पापग्रह असला तरी स्वरूपाचे बाबतीत पापफळे देत नाही. " 💢 वरील विधान, बऱ्याचशा जुन्या पुस्तकातून वाचनात आले आहे. 💢 वास्तविक कोणताहि पापग्रह पापफळे देणार, ही सर्वसाधारण धारणा असते. मग पूर्व अभ्यासकांनी असे कां लिहून ठेवले असावे ? असा प्रश्न मनात साहजिकच निर्माण होतो. 💢 लग्न, लग्नेश, लग्नातील ग्रह जातकाच्या, चेहऱ्या - मोहोऱ्यावर, वृत्तीवर, अंगकाठी - शरीरयष्टीवर विशेष प्रभाव टाकतात., असे प्रथम स्थानाचे महिमान आहे. 💢 त्याप्रमाणे, आपण प्रथम स्थान पाहून, जातक आपल्या समोर नसल्यास, त्यांचे अंदाजहि बांधतो. व ते बऱ्याच प्रमाणात, वास्तवात उतरलेलेहि दिसतात. 💢 नमुन्यादाखल काही अंदाज पाहू. 💢 वृषभ, तूला लग्न असणारे जातक सहसा सुंदर असतात. 💢 कुंभ लग्नाच्या, विशेषतः स्त्रिया सुंदर असतात. चेहरा साधारणतः लांबोळा असतो. 💢लग्नी चंद्र वा कर्क लग्न असता, चेहरा साधारणतः गोल ( पुनवेचा चंद्र ) असतो. 💢 मिथुन, कन्या लग्नाच्या जातिका सुंदर असतात. वंशपरत्वे वर्णात थोडा फार फरक पडू शकतो. पण नाकी डोळी नीट. संवादकौशल्य उत्तम असल्याने हे लोक आपली छाप सोडून जातात. 💢 लग्नी गुरु असता सुंद...