पारंपारिक गुणमेलन - समज /गैरसमज
⚛️ पारंपारिक गुणमेलन - समज /गैरसमज ⚛️ 💢 खास करून, पारंपारीक गुणमेलनाबद्दल, अजूनहि, बऱ्याच वयोवृद्ध लोकांना, त्याची फारशी माहिती नाही. 💢 36 पैकी 18 गुण जुळले, नाडी वेगळी असली, राशीत मृत्यू षडाष्टक दोष नसला, पत्रिका तथाकथित, मंगळाची नसली म्हणजे, पत्रिका जुळली, असे समजण्यात येते. 💢 परंतु, हे गुणमेलन केवळ, वधू व वराचे चंद्र नक्षत्र व त्यांचे स्वभाव परस्पराशी कसे राहतील, यांचा गोषवारा दाखविते. 💢 म्हणून, पत्रिकेत केवळ चंद्र हा एकटाच ग्रह आहे कां? इतरहि 11 ग्रह आहेत. व ते परस्परांशी शुभ /अशुभ योग करीत असतात. त्याप्रमाणे जीवनात सुख /दुःखे असतात. 💢 नेमका, या सर्व बाबींचा विचार, गुणमेलनात समाविष्ट असत नाही. 💢 त्यामुळे, केवळ 18 चे वर गुण आहेत म्हणून स्थळ पक्के केले जाते. हा निर्णय, बरेचदा एकांगी ठरण्याची शक्यता असते. 💢 स्थूल मानाने, विवाह जुळविताना, जसे आपण दोन्ही स्थळाची सामाजिक पत, शिक्षण, अनुरूपता, नोकरीं, स्थावर, एकमेकांचे संस्कार, आर्थिक स्थैर्य याबाबत चौकसपणे निर्णय घेतो. तसेच, पत्रिकेच्या माध्यमातून, खाली लिहिलेल्या बाबींचा विचार करणे, हेहि तितकेच महत्वाचे आहे. 💢 प...