कर्म धर्म संयोग
💢 कर्म-धर्म संयोग 💢 ∆ कधी -कधी जीवनात, असे काही अनुभव येतात, की आपण ते ,सहजासहजी विसरू शकत नाही. ∆ आपण पदवीधर असून, आपल्याला कुठलाहि जाँब मिळालेला नसतो. तो मिळायला पाहिजे, एवढी भावना असते पण नुकतेच, काँलेजातून बाहेर पडलेले असल्यामुळे, व्यवहाराची झळ ,लागलेली नसते. नोकरी मिळणे, किती जिकिरीचे आहे हे फक्त, एेकून माहीत असते. पण अजून, अनुभवाची पहाट उगवायची असते. ∆ नेमके अशावेळी, एखादी व्यक्ति, सहज म्हणून, आपल्याला कुठल्या तरी क्षेत्रात, अर्ज करण्याचा सल्ला देते. आपण त्यावेळी, तितकेसे गंभीर नसतो. पण, आपल्याला त्या व्यक्तीविषयी आदर असल्याने, केवळ कर्तव्य भावनेने, आपण अर्ज करतो. विशेषत: तारूण्यात, अनुभवाची शिदोरी, कमी असते व दूरदर्शीपणा, तर अगदी बाल्यावस्थेत असतो. अशावेळेस, त्या आदरणीय व्यक्तिने सांगितले म्हणून, आपण अर्ज केलेला असतो व काय आश्र्चर्य,!! लगेच पंधरा दिवसात, आपले सिलेक्शन झाल्याचे, पत्र हातात पडते. आपल्यावर, अभिनंदनाचा वर्षाव होतो. ∆ " पडत्या फळाची आज्ञा " मानुन ,आपण लगेच रूजू होतो, त्या स...