जया पुत्र -पुत्री नाही

 जया पुत्र -पुत्री नाही,

तया संतानसुख नाही.|


बाळाचा उपजत मृत्यू होई |

तया संतानसुख नाही ||


वेडे, लुळे, जन्मान्ध बाळ,

संततीची खानापूर्ती केवळ ||


 वार्धक्यात, मुके संततीस |

अवकळा ती, संततीसुखास ||


 कोर्ट-कचेरी, पुलिस ठाणे |

संतानकर्मा पोटी जाणे ||

बाधा ती संततीसुखात,

 ऐसे जनन ,कुळ कलंकीत ||


ज्ञाना परदेशी जाता,

ख्याती-नोकरी  होई |

तिथेच जोडीदार, संसार, घरदार राही ||

परी विसरती मायबापा |

म्हणावे यासहि,संतानसुख नाही ||


कुंडलीचे पंचम स्थान |

उभयतांचे नसता बलवान ||

उपरोक्त स्थिती राही |

ग्रहस्थिती दर्शवेल ||

*संततिसुख आहे की नाही?*




Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली