दैवगती ही न्यारी

💢 दैव गती ही न्यारी 💢 नाशिक वरून एका ज्योतिषी मित्राचा फोन आला. त्याचा आवाज जरा गंभीरच होता. प्रारंभी ख्याली -खुशालीच्या गप्पा झाल्यावर," आमच्या भागात एका तरुणाचा खून झाला. त्याचा जन्म तपशील माझ्याकडे आहे. तसेच या दुर्दैवी घटनेची तारीख, वेळ पण आहे. जन्म कुंडलीचा व या घटनेचा, तुमच्या दृष्टिकोनातून काही अन्वयार्थ लावता येईल का? " असे त्याने विचारले. झालेली घटना, तशी विस्मयकारकच होती. त्यामुळे नेमकी जन्म कुंडली काय सांगते? व घटनाकालीन गोचर कुंडली काय दर्शवते?, अशी उत्सुकता निर्माण झाली. 💢 दिलेल्या तपशीलानुसार जन्म कुंडली तयार केली, ग्रहांची नवमाँशगत स्थिती पाहिली. जातकाच्या महादशा ते प्राणदशा यांचा विचार केला. घटनेचे स्वरूप पाहून, आयुष्य मर्यादेचा विचार, बाधक ग्रह कोण, व कशा स्थितीत आहे ?, 64 वा नवांश कोणता येतो ? त्याचप्रमाणे ज्या दिवशी, ज्यावेळी, ही दुर्घटना झाली. त्यावेळेची कुंडली, तत्कालीन गोचर स्थिती, असा सर्व विचार केला. ( जिज्ञासू वाचकांसाठी लेखाच्या शेवटी चारही कुंडल्या दिलेल्या आहेत ) 💢 जन्म कुंडलीची,खाली लिहिलेली, नकारात्मक वैशिष्ट्ये...