दैवगती ही न्यारी
💢 दैव गती ही न्यारी 💢
नाशिक वरून एका ज्योतिषी मित्राचा फोन आला. त्याचा आवाज जरा गंभीरच होता. प्रारंभी ख्याली -खुशालीच्या गप्पा झाल्यावर," आमच्या भागात एका तरुणाचा खून झाला. त्याचा जन्म तपशील माझ्याकडे आहे. तसेच या दुर्दैवी घटनेची तारीख, वेळ पण आहे. जन्म कुंडलीचा व या घटनेचा, तुमच्या दृष्टिकोनातून काही अन्वयार्थ लावता येईल का? " असे त्याने विचारले.
झालेली घटना, तशी विस्मयकारकच होती. त्यामुळे नेमकी जन्म कुंडली काय सांगते? व घटनाकालीन गोचर कुंडली काय दर्शवते?, अशी उत्सुकता निर्माण झाली.
💢 दिलेल्या तपशीलानुसार जन्म कुंडली तयार केली, ग्रहांची नवमाँशगत स्थिती पाहिली. जातकाच्या महादशा ते प्राणदशा यांचा विचार केला. घटनेचे स्वरूप पाहून, आयुष्य मर्यादेचा विचार, बाधक ग्रह कोण, व कशा स्थितीत आहे ?, 64 वा नवांश कोणता येतो ? त्याचप्रमाणे ज्या दिवशी, ज्यावेळी, ही दुर्घटना झाली. त्यावेळेची कुंडली, तत्कालीन गोचर स्थिती, असा सर्व विचार केला. ( जिज्ञासू वाचकांसाठी लेखाच्या शेवटी चारही कुंडल्या दिलेल्या आहेत )
💢 जन्म कुंडलीची,खाली लिहिलेली, नकारात्मक वैशिष्ट्ये प्रकर्षाने लक्षात आली.
◾ हि मेष लग्नाची जन्म कुंडली असल्यामुळे, लग्नेश व अष्टमेश असलेला मंगळ, पंचमस्थानात सिंह या स्थिर राशीत आहे. लग्नेश- अष्टमेश स्थिर राशीत असता, अल्पायु योग होतो.◾ जीवनकारक रवि, अष्टमात ज्येष्ठा या क्रूर नक्षत्रात, प्लूटोसोबत आहे.◾ रविवर मंगळाची दृष्टी असून, मंगळ 26 अंशावर व रवि 22 अंशावर आहे. ◾ रवि - मंगळ अन्योन्य योगात पण आहेत. ◾ मेष चर लग्न असल्यामुळे, लाभेश शनी यास बाधक ठरतो. ◾ शनी लग्नेशाचा मित्र नसून, तो व्ययस्थानात 6 अंशावर असून, 10 अंशावरील राहुच्या दृष्टी योगात असल्यामुळे, त्याची नकारात्मकता वाढली आहे.◾ दशम स्थानात प्रजापती 8 अंशावर व वर्गोत्तम नेपच्यून 2 अंशावर आहे.◾ दशम स्थान, हे डाव्या छातीचे निदर्शक असून ( हृदय डावीकडे असते ), तेथे असणारा प्रजापती हा आकस्मिक व अनपेक्षित अडचणी आणणारा, रक्तदाब, हृदयविकार, देणारा ग्रह असल्यामुळे, अचानक हृदय बंद पडण्याची सुद्धा शक्यता दाखवतो. वरील घटनेस ही पोषक स्थिती म्हणावी लागेल. ◾ पराक्रम व भाग्य स्थानाचे स्वामी,,अनुक्रमे बुध व गुरु असून, ते भाग्य स्थानी आहे. पण त्याचबरोबर, ते शत्रू व व्यय, या दोन अशुभ भावाचे पण स्वामी आहेत. त्यांच्यावर बाधक शनीची दृष्टी असल्याने, ते दूषित झाले आहेत. ◾ दूषित गुरुची, मंगळावर अंशात्मक (26 अंश ) दृष्टी आहे. ◾ व्ययेशाची लग्नेश /अष्टमेशावर, अंशात्मक दृष्टी असणे, पिडाकारकच म्हटले पाहिजे. ◾ नवांश कुंडली प्रमाणे 64 वा नवांश कुंभ राशीचा आहे. ◾ तसेच 22 वा देशक्राण कन्याचा येतो. ◾ जातकाचे जन्मनक्षत्र विशाखा आहे.
💢 ज्या दिवशी ही घटना झाली, त्यावेळी, जातक शनीच्या महादशेत, राहूच्या अंतर्दशेत, शुक्राच्या प्रत्यंतर दशेत, केतूच्या सूक्ष्मदशेत, व शुक्राच्या प्राणदशेत होता. ◾ अल्पकालीन घटनेसाठी, प्राणदशा महत्त्वाची ठरते. ◾ मूळ कुंडली प्रमाणे, शुक्र द्वितीय व सप्तम या दोन्ही मारक स्थानांचा स्वामी आहे.
🔼 ही घटना, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या प्रथम चरणात झाली. जन्म नक्षत्र विशाखा ते पूर्व फाल्गुनी,हे 23 वे नक्षत्र येत असून, जातकासाठी ते प्रत्यर नक्षत्र ( अत्यंत अशुभ ) येते. ◾ घटनाकालीन गोचर स्थितीचा विचार केला असता, लग्नेश मंगळ,कर्क या नीच राशीत आहे.
◾ बाधक शनी मात्र, स्वराशीत असल्यामुळे बलवान ठरत आहे.◾ जीवनकारक रवि पण अष्टमात 7 अंशावर असून, त्यावर प्रजापती या कृतिका या क्रूर नक्षत्रातील, आकस्मिक संकटे आणणाऱ्या, 2अंशावर असलेल्या, पापग्रहाची दृष्टी आहे.◾ रविसोबत कष्टेश बुध आहे ◾ रविवर मंगळाची, गुरुची, प्रजापतीची व शनीची दृष्टी आहे.◾ मूळ कुंडलीत असलेली बुध -गुरु युती, या कुंडलीत सुद्धा, दृष्टीयोगात आली आहे. यात गुरु 23 अंशावर असून बुध 28 अंशावर असा " अंशात्मक दृष्टीयोग "आहे. ◾ दूषित रवि आत्मबलाचा ऱ्हास करतो ◾ चंद्र, शनीच्या दृष्टीत असल्यामुळे, मानसिक बलाचा सुद्धा ऱ्हास झालेला आहे. 💠 घटनाकालीन गोचर कुंडलीत, दशमात आलेला, वर्र्गोत्तम प्लुटो, घटनाकालीन नमांश कुंडली प्रमाणे, 64 व्या नवांशात, कुंभ नवांशात, आलेला आहे.
💠 वरील परीक्षणानुसार, मूळ कुंडलीतील ग्रहयोग, ग्रहदशा, गोचर ग्रहांची स्थिती, गोचर नक्षत्र, हे जातकाच्या आयुष्यमानाच्या दृष्टीने अनुकूल नव्हते, असेच म्हणावे लागेल.
= पुंडलिक दाते, ज्योतिष रत्न,
अकोला. मो. क्र.9421755299
Comments
Post a Comment