अपघाती मृत्यू
💢 अपघाती मृत्यू 💢
मनुष्याचे जीवन,अनेक शुभ तशा अशुभ घटनांनी, व्यतीत होत असते. मानवी जीवनात, ऑपरेशन वा अपघातदर्शक ग्रहस्थिती असेल, मग ते ऑपरेशन वा अपघात किरकोळ स्वरूपाचा असेल वा गंभीर स्वरूपाचाहि असू शकतो. गोचरीने तशी ग्रहस्थिती प्राप्त झाली असता, ती घटना, आपल्या जीवनात झाल्याशिवाय राहत नाही. त्यातून, या अपघात ऑपरेशन काळी, जर अशुभ ग्रहाच्या दशा सुरू असतील तर,त्या घटनांचे गांभीर्य अधिक वाढते.
💢 नुकत्याच एका तरुण युवकाचा नाशिकला गंभीर अपघात झाला असून, मेंदूस मार लागल्याने, जागच्या जागीच त्याचा करुण अंत झाला. या दुर्दैवी घटनेच्या वेळी, त्याचे वय 21 वर्षे 9 महिने 26 दिवस होते.
💢 त्याची जन्म कुंडली पाहिली असता, त्यात खालील प्रमाणे, अपघात- ऑपरेशनचे योग दिसतात. ◾ अष्टमेश शनी, राहूयुक्त, व्ययस्थानात असून, त्याची कष्टस्थानातील, ज्येष्ठा या क्रूर नक्षत्रातील, कष्टेश मंगळावर व फ्लूटोवर दृष्टी आहे. ◾ तसेच मंगळ व प्लुटो, यांची शनि व राहूवर दृष्टी आहे ◾ तसेच, भाग्यस्थानात बसलेल्या प्रजापतीवर,मंगळ व शनीची, दोघांची दृष्टी आहे. हे सर्व योग अपघात वा ऑपरेशन सुचवितात.◾ चंद्राच्या मारक स्थानातहि,शनि मंगळाचा दृष्टीयोग होत आहे ◾ नवांश कुंडलीत, प्रजापती हा वृश्चिक राशीत असल्याने, मंगळ प्रजापती युतीचे, तो फल देणार, हा संकेत पण अपघात दर्शक आहे. ◾ मिथुन हे द्विस्वभाव लग्न असल्यामुळे, सप्तमेश गुरु या कुंडलीत बाधक ठरतात. गुरु महाराज कसे शुभ ग्रह आहेत . पण ते दूषित झाले आहेत. ते आश्लेषा या क्रूर नक्षत्रात असल्याने, व त्यांच्यावर शनी -नेपच्यूनची दृष्टी असल्यामुळे, ते दूषित झालेले आहेत. या गुरु महाराजांची, जीवनकारक रविवर दृष्टी पडते ◾ प्रथम भावाचा स्वामी बुध असून, बुधासोबत, क्रूर मूळ नक्षत्रातील व्ययेश शुक्र असल्याने, लग्नेश - व्ययेश युती असणे, आयुष्याच्या दृष्टीने अशुभ योग आहे. ◾ क्रूर नक्षत्रातील ग्रह, शरीरास इजा करणारे ठरतात. मृत्यूस कारणीभूत असणारा अपघात का झाला?, याचा विचार करताना, अपघात वेळी, कुठला ग्रह 64 व्या नवांशात तर नाही ना? हे प्रकर्षाने पाहावे लागते, जन्म कुंडलीच्या,नमांश कुंडली प्रमाणे, हा 64 नमांश, मकरेचा आहे.
💠 लेखासोबत जन्म कुंडलीचे, व अपघातकालीन गोचर स्थितीचे चित्र दिल्याने, आपण या सर्व योगांचा पडताळा घेऊ शकतो.
💢 अपकात कालीन गोचर कुंडलीत, लग्नेश बुध कुंडलीच्या रोगस्थानात, ज्येष्ठा या क्रूर नक्षत्रात,वक्री, अस्तंगत अवस्थेत असून, त्यावर व्ययस्थानातून,गुरु व प्रजापतीची दृष्टी पडते. ◾ मूळ कुंडलित असलेला गुरु रवि दृष्टीयोग, या कुंडलीत पण आलेला आहे. ◾ बुधास पाहणारा प्रजापती, क्रूर या कृतिका नक्षत्रात आहे. ◾ या कुंडलीत पण, मंगळाची अष्टमदृष्टी शनिवर पडते ◾ त्याचप्रमाणे, शनीची रविवर दहावी दृष्टी असून, अनुक्रमे शनि 18 अंशावर व रवि 17 अंशावर, असा अंशात्मक दृष्टीयोग होतो आहे. ◾ मृत्यूकालीन गोचर कुंडलीत, मकर राशीत शुक्र व प्लुटो असून, हा शुक्र मकर राशीत व मकर नवांशात असल्याने, तो 64 नमांशात, प्रजापतीसह आहे.
◾ महादशादी विचार केला असता, अपघात समयी, जातकाची शुक्राची महादशा, शनीची अंतर्दशा, गुरुची प्रत्यंतरदशा, शनीची सूक्ष्मदशा, व गुरुची प्राणदशा होती. दुर्दैवी अपघातात, काही क्षण, महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे, त्यावेळी कोणत्या ग्रहाची प्राणदशा आहे. याचा विचार अधिक महत्त्वाचा असतो.
= पुंडलिक दाते, ज्योतिष रत्न, अकोला -9421755299
Sir, Thank you very much , very good information of accident kundali, sir please give Navamash Kundali or Birth details of the the Boy (Jatak). Eagerly waiting for next blog.
ReplyDelete