ओळख द्वितीय भावाची


 

5️⃣6️⃣
💢 ओळख द्वितीय भावाची  💢

मी आहे,  धनभाव,
घेई नित्य, धनाचा ठाव,
वाणी, वाचा, खानपान,
दर्शविण्या मज, बहुमान !! 1 !!
.
नेत्र -कंठी, माझी सत्ता,
स्वरूप सुंदर, मी शुभ असता,
"धनेशा ", माझा स्वामी म्हणती,
असेल तेथून, " लक्ष्मीप्राप्ती "!! 2 !!

शुभ ग्रह माझे, ठायी असता,
धनाची कुठलीच, नसावी चिंता,
मधुर - विनयशील,  वाचा राही,
" तोंड गोड, " तर,  सर्वच काही !! 3 !!

पापप्रभावी, जर असेल मी,
अभक्ष्य भक्षी, अपेयप्रेमी,
क्रूर -उग्र अशी, वाचा असे,
कटू वचनी,  तुटती माणसें !! 4 !!

शब्द हे रत्न, शब्द हे धन,
त्रिकालाबाधित, हे संतवचन ,
धनसंग्राहक, हा मम  बहुमान,
अन्य नाम,  तें, कुटुंब स्थान !! 5 !!

पैसा हे धन, ! शब्द हेही धन, !
संग्रह दर्शन ! काम माझे !!


Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली