ओळख अष्टम भावाची
6️⃣2️⃣
©️💢 ओळख अष्टम भावाची 💢
मी आहे, अष्टम स्थान,
देई फळे, अति दारुण,
कुंडलीचीये, त्रिक स्थानी,
मीच आहे, मुकुटमणी !! 1 !!
अष्टमे कंसा, भयभीत केले,
पुराणांतरी, असती दाखले,
अष्टमाची, अशी प्रतिमा,
लाभी वारसे, मम नामा !! 2 !!
अष्टमेश वसे, जया स्थानी,
तया ठायी, निश्चये हानी,
युति वा दृष्टी, असे जयावरी,
फले तयाची, दूषित करी, !! 3 !!
रोगपीडा, यातना कष्ट,
मृत्युसमान, माना स्पष्ट,
लग्नेश अष्टमी, असेल जरी,
स्वये होई, आपण वैरी !! 4 !!
दुर्धर व्याधी, माझिया घरी,
आरोग्याचा, नाश करी,
गुप्तपीडा,अन गुदारोग,
असेल माझा, सहभाग , !! 5 !!
अकस्मात, धनलाभ मोठा,
देईल मी, करुनी तोटा,
वारसाने संपत्ती,
देणे असे, माझिये हाती !!6 !!
लाचलुचपत, काळा पैसा,
मिळवण्या तो, निषेध कैसा ?
विनाश्रमाचे, देई धन,
अष्टमाचे हे, महिमान !! 7 !!
अष्टमी असता , ग्रह बलवान,
शुभ - अशुभ मज, एकसमान,
शुभासवे, लाभे संपत्ती,
अशुभासवे, येई विपत्ती !! 8 !!
अष्टम तें, मारक स्थान,
दोन-तीन-सात मी, गणना पूर्ण,
स्थानाचे या, अधिपती,
अशुभ फळा, कारण होती !! 9 !!
महाराज शनी, वसती जरी,
करती बळकट, जीवन दोरी,
अमोघ हे, मज वरदान,
त्वरित नव्हे, खितपत मरण !! 10 !!
Comments
Post a Comment