जरा गंम्मत करु !
💢 जरा गंम्मत करु !💢
आयुष्यात कधी -कधी,
पडतो, मोठा पेच,
अचानक, कधी -कधी,
लागते, मोठी ठेच !!
तेव्हा वाटतं, खरंच कां ?,
अंदाज, अख्ख्या आयुष्याचा,
दडलाय, इवल्या हातात ?,
बघू तर खरं -!,
ज्योतिषी, काय सांगतात. !!
मग पाहतील, त्याचा हात,
कोणते तरी, दर्दी डोळे,
उभ्या आडव्या रेषा-चिन्हे ,
ते अनाकलनीय जाळे !!
काहि उलगडतील कोडी,
तर काहि, पहाता मन गोंधळे,
करतील गर्दी, मनात,
बहुविध ठोकताळे !!
सुखद ते सहज, येतील ओठी,
दुःखद ते मनात, करतील घरटी,
बारीक -सारीक, शंका-कुशंका ,
शमविली जाते उत्सुकता,
चांगल्याची होती, स्वप्ने सोनेरी,
वाटे वाईट, अपेक्षा भंगता !!
बोटभर गूढ रेषा-चिन्हे, जव,
उगीच वाकड्यात शिरतात,
आडमुठ्या मनाला,
घटकेत, सरळ करतात. !!
रेषां-खुणांचा हा गुंता,
कधी सुटतो, कधी सुटत नाही,
म्हणून कुणी, ठेवी विश्वास,
तर कुणी, मुळीच ठेवत नाही !!
काय खरे, काय खोटे ?
मनात चुकचुके पाल,
तरीपण, दाखवावा वाटे हात,
ही आहे की नाही ? - कमाल !!
== पुंडलिक दाते, अकोला
9421755299
Comments
Post a Comment