Posts

Showing posts from January, 2021

द्विभार्या योग

Image
पत्रिकेतील " द्विभार्या  योग " 💢जेव्हा पत्रिकेत, ज्योतिषांकडे, विवाह विषयक प्रश्न विचारले असता, बरेचदा " द्विभार्यायोग " सांगितला जातो. तेव्हा, जातकाच्या मनात, चिंतेचे मळभ तयार होते. तो अतिशय चिंताग्रस्त होतो.        अशा प्रकारच्या, बर्‍याचशा पत्रिका माझ्या पाहण्यात आलेल्या आहेत.  त्यामुळे,  आलेल्या अनुभवानुसार, द्विभार्या योगाचे स्वरूप, कसे आहे ?, हे नमूद करणे, मला इष्ट वाटते. 💢 वरील विषय खूप गहन आहे. 💢 काही पत्रिकांमध्ये " द्विभार्या योग " असतो, जसा पुरुषांमध्ये असतो, तसाच तो  स्त्रियांमध्येहि  दिसून येतो. 💢 परंतु या योगाचे स्वरूप नीट समजून घ्यावे लागते. 💢 एखाद्या व्यक्तीने, तुम्हाला मनोमन  वरले असेल व  त्या व्यक्तीस तुम्हीहि    मनोमन वरले असेल, परस्पराची पसंती, एकमेकांना कळली असेल, अशी स्थिती असून, जर पुढे त्यास यश आले नाही, तरी ते द्विभार्या योगात मोडते. किंवा 💢 विवाहा पूर्वी, वा क्वचित विवाहोत्तर, अशा प्रकारचे, अनैतिक संबंध सुद्धा, असू शकतात. 💢 या ठिकाणी, हे स्पष्टपणे नमूद करतो की, जीवनात कोणतीही घटना, मग ती शु...

विचारमंथन -गुणमेलनाचे

Image
विवाह विषयक गुण, मेलनासंबंधी: ∆ मूळात पत्रिका जुळवणे ,या बाबत समाजात ,अनेक संभ्रम आहेत. काही ठराविक ,इथे नमूद करीत आहे.   1.फक्त गुण (१८)पहा .फार खोलात जाण्यात हंशील नाही कारण ,कोणतीहि पत्रिका पूर्णपणे शुध्द नसते ( दुर्दैवाने हे खरे आहे ). 2.फक्त आपल्याच कडे गुणमेलन पहातात .इतर धर्मात पाहत नाहीत ,मग त्यांचे कुठे अडते ? 3.गुणमेलन हे साळसूदपणे नकार देण्याचे साधन आहे.स्थळ न आवडल्यास ,तसे स्पष्ट न सांगता, गुणमेलनातील त्रुटी ,पुढे कराव्यात. 4.अमुक अमुक जोडप्याचे तर 36 गुण होते तरी पण, टिकले नाही ,मग गुणमेलनाचा काय उपयोग ? ∆ वास्तविक परंपरेप्रमाणे गुणमेलन पाहिले जाते व जोडीने मंगळ विचार केला जातो. ∆ गुणमेलन हे वधूवरांच्या जन्मचंद्र नक्षत्रावर आधारीत असल्याने ,फक्त चंद्राचाच विचार केला जातो. कुंडलीतील इतर ग्रहांचा, वा ग्रह स्थितीचा विचार केला जात नाही. ∆"गुणमेलनाचा व इतरही ग्रह स्थितीचा साधक -बाधक विचार व्हावा " हा एका ओळीचा संदेश फार महत्वाचा आहे. ∆ कुंडलीत नि:संतान योग,नपुंसकयोग, वैधव्य योग विधूर योग, द्विभार्या योग, व्यभिचार योग, बहुविवाह योग, संन्यास योग, कारावास योग, दारिद्र्य ...

ओळख "भविष्य दर्पण "अंकाची

Image
  ओळख " भविष्य दर्पण "  इ मासिक-जानेवारी 2021 या अंकाची. श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष्य संशोधन केंद्र, जळगाव  या संस्थेच्या विद्यमाने,  प्रकाशित होणारा "भविष्य दर्पण" इ -मासिकाचा  जानेवारी 2021 चा  अंक, नुकताच प्रकाशित झाला.  💢 या अंकाचे मुख्य वैशिष्टय असे की, या अंकात, अष्टक वर्गावर आधारित, विवाहसंबंधी, तो प्रेमविवाह असेल की आयोजित ?, आयोजित असेल तर,  तो  जातकाच्या स्वेच्छेने, वा, आई वडिलांच्या इच्छेने , वा त्यांच्या इच्छेखातर, असेल कां?  या संबंधी,  92 पत्रिकांचा अभ्यास करून,  त्यातून काही ठोस निदाने,  केंद्र  संचालिका,  ज्योतिष्याचार्या, आ.   डॉ. सौ. ज्योती जोशी, यांनी केली आहेत. 💢 हे निष्कर्ष अभ्यासपूर्ण असल्याने,  त्यांना,  नियमाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  💢 अष्टकवर्गाच्या अभ्यासकांना, ते निश्चितच मार्गदर्शक ठरतील. हा उपक्रम ज्योतिष्य शास्त्राच्या दृष्टीने,  निश्चितच आगळा वेगळा व स्तुत्य आहे.  💢 या सर्व कुंडल्याचे,  अष्टक वर्गाच्या माध्यमातून, एकत्र संकलित केलेल...