ओळख "भविष्य दर्पण "अंकाची
ओळख " भविष्य दर्पण " इ मासिक-जानेवारी 2021 या अंकाची.
श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष्य संशोधन केंद्र, जळगाव या संस्थेच्या विद्यमाने, प्रकाशित होणारा "भविष्य दर्पण" इ -मासिकाचा जानेवारी 2021 चा अंक, नुकताच प्रकाशित झाला.
💢 या अंकाचे मुख्य वैशिष्टय असे की, या अंकात, अष्टक वर्गावर आधारित, विवाहसंबंधी, तो प्रेमविवाह असेल की आयोजित ?, आयोजित असेल तर, तो जातकाच्या स्वेच्छेने, वा, आई वडिलांच्या इच्छेने , वा त्यांच्या इच्छेखातर, असेल कां? या संबंधी, 92 पत्रिकांचा अभ्यास करून, त्यातून काही ठोस निदाने, केंद्र संचालिका, ज्योतिष्याचार्या, आ. डॉ. सौ. ज्योती जोशी, यांनी केली आहेत.
💢 हे निष्कर्ष अभ्यासपूर्ण असल्याने, त्यांना, नियमाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
💢 अष्टकवर्गाच्या अभ्यासकांना, ते निश्चितच मार्गदर्शक ठरतील. हा उपक्रम ज्योतिष्य शास्त्राच्या दृष्टीने, निश्चितच आगळा वेगळा व स्तुत्य आहे.
💢 या सर्व कुंडल्याचे, अष्टक वर्गाच्या माध्यमातून, एकत्र संकलित केलेली आकडेवारी, व त्यावरील निष्कर्ष निश्चितच पारदर्शी आहेत.
💢 अभ्यासू वाचकांसाठी हि मेजवानीच आहे.
💢 नवोदित अभ्यासकांना, या बहुसंख्य कुंडल्या, त्यांच्या विवेचनासह मिळणे, हि पर्वणीच ठरेल. यास " घबाड मिळणे "असे संबोधले तरी, वावगे होणार नाही.
💢 अंकाच्या सुरुवातीच्या लेखात, विषयाची प्रेरणा, त्यांची पार्श्वभूमी, प्रत्येक निष्कर्ष काढतांना, कोणती मूळ तत्वे वापरली गेली? याचे सुबोध विवेचन केले आहे. जे, सर्व साधारण ज्योतिष प्रेमी वाचकाच्या, सहजपणे लक्षात येते.
💢 थोडक्यात हा अंक केवळ वाचनीय नसून कायम संग्रहणीय आहे.
💢 विवाह या विषयांचे अनेक अंतरंग, अष्टक वर्गाच्या माध्यमातून, याच पद्धतीने, उलगडण्याचा, त्यांचा मनोदय या अंकात व्यक्त केला गेला आहे.
💢 त्यांच्या कार्याची सुसूत्रता, नियोजनबद्धता, त्यांना या कार्यात निश्चित यशाच्या शिखरावर पोहोचवेल, यात शंका नाही.
💢 पुढील अंक केव्हा येईल? अशी उत्सुकता निर्माण करणारा हा अंक आहे.
💢 या अंकाची सदस्यता शुल्क, इतर अंकाच्या तुलनेत अगदी नाममात्र आहे, हे विसरता येत नाही.
💢त्यांच्या या बहुमोल कार्यास अनंत शुभेच्छा.
= पुंडलिक दाते, अकोला

Comments
Post a Comment