दैव
💢 जन्म -प्रारब्ध -भोग अटळ आहेत 💢 ∆ बाळ जेव्हा जन्माला येते ,ती वेळ आपण प्रमाण मानतो. सूक्ष्म विचार केल्यास, याचे कारण लक्षात येईल की, बाळाची जन्मवेळ हा त्यांच्या जन्माचा " मूहूर्त" असतो. व त्याने ठरविलेल्या मुहूर्तावर, तो नैसर्गिक रित्या, वा आॅपरेशन द्वारा, जन्म घेतो. कारण त्या मुहूर्तावर, असलेल्या ग्रहस्थिती नुसार, त्याच्या मानवी जीवनाची, रूपरेषा ठरलेली असते. त्याच्या जन्मा अगोदरच, त्याच्या भावी जीवनाची पटकथा, ग्रहता-यांच्या लिपीत, लिहिली गेलेली असते. ∆ नियतीने ठरविलेल्या वेळेवरच , तो पृथ्वीतलावर प्रवेश करून, जगास दृश्यमान होतो. पृथ्वीवरील, पहिल्या श्वासापासून मानवी आयुष्याची सुरुवात , अविरत, शेवटच्या श्वासापर्यंत चाललेली असते. या दोन श्वासां मधला काळ, कसा घालवायचा हे नियतीने ,अगोदरच ठरविले असते. पौराणिक दाखला द्यावयाचा झाल्यास, ऋषी शापामुळे, गंगेच्या पोटी , अष्टवसूंना जन्म घ्यावा लागला. निरपराध वसूंना ,केवळ जन्म घ्यावयाचा होता ,जीवन जगावयाचे नव्हते ,म्हणून गंगा ,त्यांना जिवंतपणी ,नदीत विसर्जित करत होती व छातीवर दगड ठेऊन, शंतनू ते पहात होता. इच्छा असूनहि ,असे कां? ...