बुध -मंगळाचे योग

💢 बुध मंगळ व त्यांचे योग 💢 ग्रह मंडळात एकूण 12 ग्रह असून, त्यात काही ग्रह एकमेकांचे मित्र अधिमित्र, तर काही ग्रह एकमेकांचे शत्रू, अधिशत्रू आहेत. ग्रहांच्या परस्परातील संबंधावर, संपूर्ण कुंडली, ज्योतिष शास्त्राची संकल्पना उभारलेली आहे. ग्रहांच्या परस्परातील शत्रुत्वाचा विचार केला असता, त्यामध्ये रवि -शनी, बुध -मंगळ, मंगळ- हर्षल, शनि -मंगळ, शनि- चंद्र, शनी -हर्षल या ग्रहांचे युतियोग वा दृष्टीयोग अत्यंत तीव्र फळे देताना आढळतात. त्यात ते अंशात्मक योगात व क्रूर नक्षत्रात असल्यास, अशुभ फलांची तीव्रता आणखीनच वाढते. ◾️ आज आपण बुध व मंगळ यांच्या युति व दृष्टीयोगाचा, मनुष्य जीवनावर कसा परिणाम होतो ? हे काही कुंडल्यांच्या आधारे पाहणार आहोत. ◾️ मंगळ बुध युति व दृष्टीयोगामध्ये साधारणपणे,⚛️ व्यक्तीची स्मरणशक्ती उत्तम असते. ⚛️ गणित विषयात त्याची प्रगती असते. ⚛️ संगणक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये ती व्यक्ती प्रभुत्व...