विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या टिप्स -2
💢विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या टिप्स -2💢
आजच्या काळात प्रत्येकास मोबाईल वापरणे ही काळाची गरज ठरलेली आहे. मोबाईल का माध्यमातून बरेचदा आपल्याला इतरांना संदेश द्यावे लागतात. मातृभाषेतून आपल्या भावना आपले विचार प्रभावीपणे प्रगट होत असतात.
परंतु असे निदर्शनास येते की बऱ्याच लोकांना देवनागरीतून लिहिणे हे कठीण जाते त्यामुळे येथे मराठीतून लिहिताना रोमन लिपीचा वापर करतात. एखादे दुसरे वाक्य असेल तर ते वाचणाराला तेवढे अवघड जात नाही. परंतु फार मोठा परिच्छेद असेल तर, वाचणाराला त्याचा अर्थ लवकर कळत नाही. व ते वाचन त्रासदायक ठरते.
◾️ ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना, आपल्याला मातृभाषेतून ऑनलाईन पेपर सोडवावे लागतात. तसेच ज्योतिष्य अलंकार, ज्यो. वाचस्पती,ज्योतिष रत्न या वरिष्ठ श्रेणीच्या परीक्षांमध्ये, प्रबंधाचा समावेश आहे. प्रबंध म्हणजे थोडक्यात, कुंडलीचे संपूर्ण विवेचन असे म्हणता येईल.
◾️हे प्रबंधाचे विवेचन आपल्याला मातृभाषेतून करावयाचे असते. अशा वेळेला जर आपल्याला मराठी टंकलेखन येत नसेल तर, अडचणी येतात, आपल्याला अवघडल्यासारखे होते. आपल्या या समस्येवर एक उत्तम समाधान आहे.
◾️ गुगल प्ले स्टोअर वरून " देश मराठी " हे निशुल्क ॲप डाऊनलोड करा. व आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये ते इन्स्टॉल करा.
हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या कीबोर्ड मध्ये, वरच्या कोपऱ्यात, एक माईकदर्शक चिन्ह येते. हे चिन्ह बोटाने ऍक्टिव्हेट केल्यास, त्याच्या बाजूला निल्या रंगाची पट्टी येऊन, संकेत ध्वनी येतो. त्याच बरोबर "प्लीज स्पीक " अशा सूचना बोर्डवर दिसतात.
◾️ तेव्हा मोबाईल अगदी जवळ घेऊन आपण स्पष्ट शब्दात जे बोलाल, ते वर मॅटर मध्ये टाईप होते. यामुळे आपले टाईप करण्याचे श्रम वाचतात.
◾️
फक्त यात दक्षता एवढीच घ्यावयाची की आपले बोलणे एका लयित , न थांबता, व स्पष्ट उच्चार असलेले असावे. आपले उच्चार अस्पष्ट असता, चुकीचे शब्द टाईप होतात. मग ते आपल्याला व्यक्तिशः दुरुस्त करावे लागतात. तरी एकंदरीत पाहता, हे ॲप अत्यंत सोयीचे असते.
◾️ आपल्याला मराठी ऐवजी, इंग्रजी भाषेत जेव्हा टाईप करावयाचे असेल तेव्हा, स्पेस बार च्या बाजूला "अ " अक्षर लिहिलेला टॅब वापरावा. त्यामुळे भाषेत बदल होतो.
सुलभ संदर्भासाठी या ॲपचा आयकॉन, तसेच कीबोर्डचा नकाशा या लेखासोबत देत आहे.
= पुंडलिक दाते, अकोला
Comments
Post a Comment