ज्यो. रत्न प्रबंध विषयक सूचना

 💢 ज्योतिषरत्न परीक्षेसाठी निर्धारित केलेले प्रबंधाचे विषय 💢

1 कोर्ट केस  2.नि: संतान योग.( पती-पत्नी दोघांच्या कुंडल्या असता, त्या दोन कुंडल्या समजल्या जातील ) 3.परित्यक्ता ( ज्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला नाही, परंतु विभक्त राहतात ) योग  4.ऑपरेशन योग.  5.त्वचा विकार 6. अविवाहित व्यक्ती 7.घटस्फोटीत / घटस्फोटीता

 वरील सात विषयांपैकी कोणतेही पाच विषय आपल्याला निवडता येतील. व प्रत्येक विषयाच्या दहा कुंडल्या, याप्रमाणे एकूण 50 कुंडल्याचा प्रबंध, प्रत्यक्ष परीक्षासमयी सादर करावयाचा आहे .

 हे सर्व विषय, सर्व सामान्य जातकांच्या जीवनाशी निगडित असल्यामुळे, कुंडलीतील ग्रहमान  व विषयाशी संबंधित ग्रहस्थितीचे सविस्तर विवेचन असणे आवश्यक आहे.

◾️कुंडलीतून दिसणाऱ्या जातकाच्या जीवनातील इतर विविध  घटनांपेक्षा, प्रबंधाचा जो विषय आहे. त्या घटनेवर, सांगोपांग मुद्देसूद लेखन करावे. जन्म कुंडली, चंद्र कुंडली, नवाश कुंडली, संबंधित वर्ग कुंडली, घटना जर एखाद्या विशिष्ट दिवसांशी संबंधित असेल तर, त्या दिवशीची गोचर कुंडली, अष्टक वर्ग, या सर्व घटकांचा विवेचनाच्या ओघात  समावेश करावा. योग्य त्या ठिकाणी संबंधित कुंडलीची चित्रे पण द्यावीत. 

◾️ या अगोदर अलंकार, वाचस्पती  परीक्षेत सादर केलेल्या प्रबंधाचा, आपणा सर्वांना अनुभव आहेच. त्याच पद्धतीने हा प्रबंध पण सादर करावयाचा आहे.

💢 एकूण 50 कुंडल्या म्हटल्यानंतर, प्रबंध तयार करायला बराच वेळ लागतो. त्यामुळे जर आतापासून आपण स्वतः निवडलेल्या विषया संबंधी, कुंडल्या संग्रहीत करण्याचा, तातडीने  प्रयत्न केला तर, आपणा सर्वांचा प्रबंध, वेळेपूर्वीच तयार होऊ शकतो. मात्र त्याचा ध्यास घेणे, हे आवश्यक असते. आपले मित्र, नातेवाईक, यातून जातक निवडताना, जर आपण प्राधान्य दिले तर, ओळख-परिचय असल्यामुळे, कुंडलीचा सुलभ पणे अभ्यास होतो, व आपण आत्मविश्वासाने लिहू शकतो, असा माझा अनुभव आहे.

= पुंडलिक दाते, अकोला

Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली