दैव कळे कां कुणा? लेख

 " दैव काहे का?"



मति गंग करणारी अशी, ग्रहस्थिती असलेली कुंडली, आज अभ्यासावी लागली।

💠 ही मकर लग्नाची कुंडली असून, लग्नस्थानी भ्रम  फसवणूक व  गोंधळ करणारा नेपच्यून 26 अंशावर आहे । लग्नेश  शनि महाराज, अष्टमस्थानात आपल्या निर्बल राशीत असून, ते वक्री व वर्गोत्तम स्थितित, मघा नक्षत्रातील केतु सोबत, राहु, प्रजापतिच्या दृष्टीत, बसले आहेत। यशाच्या दृष्टीने लग्नेश अष्टमात् व निर्बल राशीत असणे चांगले नाही। 💠 पराक्रमेश व व्ययेश  असलेले गुरु महाराज, अस्तगत अवस्थेंत, मूळ या क्रूर नक्षत्री, अष्टमेश रवि व भाग्येश व कष्ट्येश असलेल्या, अस्तगत बुधासोबत, तसेच,मुळ नक्षत्रातिल प्लुटो सोबत आहेत.💠चतुर्थेश  व लाभेश असलेला मंगळ, कष्टेश बुधाच्या राशित्, वकी अवस्थेत असुन, ते कष्टस्थानातून रवि -बुध -गुरु-प्लूटो यांना पहात आहेत।💠 पंचमेश व दशमेश असलेला शुक्र लाभस्थानात पुष्कर नवमांशी आहे। 💠सप्तमेश असलेला चंद्र, तुला राशित् दशमात् असून, त्यावर शनिचि तिसरी दृष्टी येते । ◾ शनीची चंद्रावर दृष्टी असणे , मनात वैफल्य निर्माण निर्माण करणारी असते। ◼️कुंडलित शनि अष्टमात् दुर्बल अवस्थेत असुन, अष्टम भावाचा स्वामी रवि, व्ययभावाचा स्वामी, मुळ नक्षत्रातिल गुरु, कुंडलीच्या,कष्ट भावाचा स्वामी बुध, असल्यामुळे,बारावा भाव लग्न भावाच्या तुलनेत खूप बलवान झाला आहे। ◾ 6, 8, 12 ही त्रिक स्थाने अशुभ संकेत देतात । या तीन स्थानपैकी कोणत्याही एका स्थानचाचा स्वामी, त्याच स्थान असुन दुसऱ्या त्रिकस्थानाचा स्वामीसुद्धा त्याच्यासोबत असेल तर, "विमल विपरीत राजयोग" होतो। या योगामुळे जीवन अतिशय संकटे आलि तरि, त्यात ती व्यक्ति झगडून,आहे त्या परिस्थतित, समाधान मानणारी असतें. परंतु या योगाचे फ़ल मिळण्यासाठी, लग्नेश मात्र बलवान असावा लागतो। त्याशिवाय या योगाचे कारकत्व दिसुन येत नाहीं। इथे मुळातच लग्नेश शनी निर्बल असल्यामुळे,या योगाचे फ़ल मिळाले नाही. ◾ नवाश कुंडली प्रमाणे, शनि महाराज वर्गोत्तम दिसत असले तरी, नवाश कुंडलित त्यांच्यासोबत भ्रम,गोंधळ, फसवानुक करणारा नेपच्यून आहे.◾ जेव्हा बुध व मंगल  यांची युति असते, वा ते दृष्टी योगात असतात, तेव्हा ती व्यक्ति अतिशय हट्टी, जिद्दी होते. हे दोन्ही ग्रह एकएकाचे शत्रु असल्यामुळे मंगळ साहसाचा कारक असून,बुध बुद्धीचा कारक असल्यामुले, बुधाला मंगळ अतिरिक्त साहसाचा पुरवठा करतो। व त्यामुळे बुध दुषित होतो. त्याची सारासार विवेक बुद्धी विनाश होते। अशा स्थितित, त्या व्यक्तिच्या हातून, काही अघटित, उलटा सुलट कार्य सुद्धा होऊ शकतात। नवंशात बुध मंगल युती अष्टमात आहे ◾ रवि व मंगल दृष्टीयोग, हे दोन्ही ग्रह अग्नि तत्वाचे असल्यामुळे, व्यक्तिला तापट बनवतो। ◾ गुरुवर मंगलाची दृष्टी असता, व्यक्तित फाजिल आत्मविश्वास असता निर्माण होतो.

💢 मिळेल्या माहितीप्रमाणे ज्योतिषचे 19 वे वर्ष सुरु असून, त्याने एके दिवशी आत्महत्या केली आहे। या घटने पूर्वहि त्याच्या मनात, काही दिवस अगोदर, तसे विचार येत होते,अशी पण माहिती मिळाली.

💢 वास्तविक पाहता, विद्यार्थी दशेत,  आत्मघाती विचार येतिल, शा कोणत्याही समस्या नस्तात। पालकांचे कृपा छत्र, त्यांच्या छोट्या- मोठ्या समस्या सोडवण्यासाठी अहर्निश उपलब्ध असते। ◼️ चंद्र शनीने दूषित असणे, बुध मंगलाचा दृष्टी योग, यामुळे आतताई स्वरूपाची कृति करणे, लग्नी नेपचुन असल्यामुळे, गूढ़ काल्पनिक भीति वाटणे, व त्यातुन आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होणे, न्यूनगंड निर्माण होणे, अशी फळे मिळण्याची शक्यता असते।

💢ज्या कुंडलित लग्नेश, अष्टमेश, तृतीयेश यान्चे एकमेकांशी संबंध अस्तात्, त्या कुंडलित, काहितरी अघटीत घडण्याची शक्यता असते, असा अनुभव बऱ्याच कुंडल्यातून आला आहे। ◾ या कुंडलित लग्नेश अष्टमात, तृतीयेश व व्ययेश असलेले गुरु महाराज त्यास पहात आहेत  अष्टमेश व व्ययेश हे व्ययभावात आसुन, कष्टाचा स्वामी पण तिथेच आहे। 

💢दिनांक 4 अक्टूबर 2025 या दिवशी, सकाळी 8 वाजता, याने चौथ्या मजल्यावरुन उडी घेतली। त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. शेवटी रात्रि 10 वाजून 40 मिनिटानी त्याचे निधन झाले ◾ या घटनेप्रमाणे गोचर कुंडली काढली असता, लग्नेश शनि महाराज नेपच्यून सोबत, मीन या द्विस्वभाव राशित् होते। व त्यावर रवीची दृष्टी असल्यामुळे, हाडाची मोडतोड होण्यास हा योग पोषक ठरतो। त्याचप्रमाणे चन्द्र व राहु युति, या दोन्ही बाबी, याची मनस्थिती ठीक नसल्याचे संकेत होत. 💠 व्ययभावाचे स्वामी गुरु महाराज, कष्टस्थानी आसुन, ते व्ययभावास पाहत होते। मुळ कुंडलीत, दृष्टी योगात असलेले बुध मंगळ, यावेळी युतियोगात दशमात असुन, बुध दशमात वर्गोत्तम होता । 💠 अपघातकालीन ग्रहयोगाची नवमांश कुंडली पाहिली असता, या कुंडलीत, चंद्र वृश्चिक राशित, नीच अवस्थित होता । कुंभेचा मंगल असल्यामुळे, शनि मंगल युतिचे फल मिळणार, असे संकेत होते । या मंगलावर नेपच्यूनची दृष्टी होती . 💠 सर्वात् महत्वाचे म्हणजे, मूळ जन्म कुंडलीत 64 वा नवाश, कर्क राशि येत असुन, या नवाश कुंडलित, कर्क राशि अष्टमात् असून, त्यात् मुळ लग्नेश  शनि महाराज होते।

◼️ जन्म कुंडली 64 व्या नवशात् जी राशि येते, संकटकाळी जर त्या राशित् कोणी ग्रह असेल तर, तो मृत्युदायक पीड़ा देण्यास कारणीभूत होतो। या नियमप्रमाणे, मुळ लग्नेश शनि महाराज, हे अपघात कालीन कुंडलीच्या, नवांश कुंडलीत, कर्क नवांशात होते. अपघातकालीन नवमांश मध्ये, कर्क राशि असलेले शनि, मृत्युवेळेच्या नवांशकुंडली मध्ये सुद्धा, कर्क राशितच होते ।

💢 विशोतरी महादशेप्रमाणे विचार केला अस्ता, जातकाला गुरुची महादशा असून, गुरुचीच अंतरदशा प्रत्यंतर दशा व शनिचि सूक्ष्मदशा व राहुचि प्राणदशा होती । आकस्मिक घटना, अपघात, यात काही क्षण महत्वपूर्ण असतात्। त्यामुळे, सूक्ष्मदशा, प्राणदशा, याच्या स्वामीना विशेष महत्व द्यावे लागते। मुळ कुंडलित गुरु महाराज पराक्रमेश व व्ययेश  असून, शनि, राहूच्या दृष्टीत असल्यामुळे, विशोतरी दशेप्रमाणे सुद्धा, काळ विपरीत होता असे म्हणावे लागेल।

|| शुभम् भवतु ||

पुंडलिक दाते, ज्योतिष रत्न, अकोला 

9421755299

Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली