5️⃣9️⃣
©️💢 ओळख पंचम भावाची 💢
लग्नानंतरचे शुभ स्थान,
मी असे , पंचम स्थान,
कला, विद्या, संतती,
मीच आहे, अधिपती !! 1 !!.
सट्टा, जुगार, धनप्राप्ती,
देणे असते, मज हाती,
पंचमेशा वरदान,
असो कुणीही, बहुमान !! 2 !!
काव्य क्रीडा, साहित्य, शृंगार,
सकल गुणांचा, मी आधार,
जव असेल मी, दूषित विकल,
कुक्षी प्रसवण्या, होई दुर्बल !! 3 !!
इष्ट देवता, दावी पंचमेश,
पूजा अर्चना, करा विशेष,
शुभत्व असता, जातक गुणी,
होई बहुमुखी, प्रतिभा धनी !! 4 !!
असता अशुभ, विकल मी,
नव्हे यशाची, कुठलीही हमी,
पंचमासि हा, विशेष मान,
मजला म्हणती, "यशस्थान " !! 5 !!
Comments
Post a Comment