6️⃣0️⃣
©️💢 ओळख षष्ठ भावाची 💢
मी आहे, स्थान षष्ट,
नेमियले मज, द्यावया कष्ट,
रोगराई, व्याधी, आजार,
झोळी माझिया , भरपूर !! 1 !!
माझा स्वामी, कष्टेश,
कष्ट द्याया, करी प्रवेश,
वसेल तेथे, बहू अडचणी,
मिळतील फळे मग , उणी-दुणी !! 2 !!
जीवन -वसनी, दोनच धागे,
सुख पुढे तर, दुःखहि मागे,
आधि -व्याधी, कुणा सुटेना,
दशांतरी मग , होती यातना !! 3 !!
कर्ज पीडा ती, राही उरी,
मीच दावी, शत्रू -वैरी,
उदर, कटी वर, माझी सत्ता,
शूल पीडक मी, अशुभ असता !! 4 !!
अपघातादि, शल्यक्रिया,
जाणावी ती, मम किमया,
दास सुखाचा भावही, मी,
मातुल सुखाचे, आगर मी !! 5 !!
.
परि, दशमाचे मी, भाग्यस्थान,
परिश्रमाचे, शुभ फल देईन,
नोकरीं -चाकरी, माझे पायी,
एकमेव गुण मज , भूषणदायी !! 6 !!
Comments
Post a Comment