ओळख प्रथम भावाची
5️⃣5️⃣
💢 ओळख प्रथम भावाची 💢
मी असे, प्रथम भाव,
"लग्नभाव" हे, टोपण नाव,
बिरुद माझे, त्रित्रिकोण,
सर्व भावे मज , अग्रमान !! 1 !!
माझा स्वामी, दर्शवी राशीं,
कुठल्या भावी ?, करा चौकशी,
कुठल्या राशीत ? , कोणत्या अंशी ? ,
कुणाची दृष्टी ? , युति कुणाशी ? !! 2 !!
माझे अंगी, असती कोण ?,
बघा तयांना, त्यांचे गुण,
फल मी देई, शुभ की न्यून? ,
सर्वस्वी त्यावर, अवलंबून. !! 3 !!
चारित्य्र, ठसा, व्यक्तित्व, प्रभाव,
हाच माझा, स्थायी भाव,
देहमूर्ती व, आरोग्यवृत्ती,
दर्शविणारा मी, अधिपती !! 4 !!
तनु, लग्न, स्व, मम, बरीच नांवे,
आळविती सकल मज, मनोभावे,
लग्नस्वामी मग, कुणीही असता ,
होई सदैव, शुभफलदाता !! 5 !!
अभ्यासपूर्ण लिखाण, खेळती भाषा ज्योतिषाचे ज्ञान तोंडओळख होते!
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🌺
ReplyDelete