ओळख चतुर्थ भावाची
5️⃣8️⃣
©️💢 ओळख चतुर्थभावाची 💢
सुखस्वामी मी, चतुर्थभाव,
मातृस्थानहि, माझेच नाव,
वास्तू, वाहन, शेतीवाडी,
याची मजला, खूप आवडी !! 1 !!
मातृ प्रेम हे, कसे मिळेल ?,
मजविण तुम्हा, तें कसे कळेल ? ,
शुभत्व असता, मातृ ममता ,
अशुभ असता, भासे न्यूनता !! 2 !!
शुभता मजला, असेल जरी,
सर्व सुखे, मिळतील खरी,
छाती, हृदयी, माझे नाते,
दावी मीच, मातृसुखाते !! 3 !!
"श्री गणेशा " मी विद्येचा,
आद्यगुरू, हा, मान आईचा,
निद्रासुखहि माझे तनयी,
नसता शुभ, हिरावून घेई !! 4 !!
जन्मस्थानी होई प्रगती,
मम शुभता, तिचीच महती,
अशुभ असता, येई प्रचिती,
परदेशी मग, होई उन्नती !! 5 !!
अशुभाचा तर, अनुभव भारी,
स्थावराची , कोर्ट कचेरी,
मनःशांतीवर, येईल ताण,
पैसा, शक्ती, -धूळधाण !! 6 !!
Comments
Post a Comment