6️⃣1️⃣
©️💢ओळख सप्तम भावाची, 💢

काम त्रिकोणी,  "मध्य भाव ",
सप्तम भाव, त्याचे नाव,
सर्वभावे, "मध्य " भाव,
जायास्थान तें, माझेच नाव  !! 1 !!

बाल, तारुण्य आणि जरा,
जीवनाचा हा, नियम  खरा,
इथेही मजला,  "मध्य "मान,
मीच पल्लवी, काम -यौवन  !! 2 !!

पुष्पांमध्ये,  जेवी पराग,
" मध्य " वर्ती, कोमल भाग,
मानव काया, तत्सम जाणा,
देह -"मध्या",  विषय वासना,  !! 3 !!

जाया सुखाचे, मीच आगर,
कसा असेल तो, जोडीदार ?,
भेटेल उशिरा ? , कां लवकर, ?
रचित विवाह ? ,  कां स्वयंवर ? !! 4 !!

स्वरूप त्याचे, कसे असेल ?
पटेल -टिकेल कां ? , नुसते खटकेल ?
सकल, समूळ, शंकांची उकल,
मजविण दुजा, कोण करेल ?  !! 5 !!

रज -वीर्य अन, जनन क्षमता,
राही सबल, मी शुभ असता,
पितृ ऋण फिटे, वंश विस्तारी
शुभत्व असता,  सुफले  सत्वरी   !! 6  !!

दिवाणी दावे, कोर्ट कचेरी,
जय पराजयाचा, मी मानकरी,
अशुभ मी, असेल जरी,
विषयसुखा, दूषित करी  !! 7 !!

घरधनी असो वा, घरधनीण,
सुपात्र असता, सफल जीवन,
काय नेमके, आहे प्राक्तन ?,
ग्रहसंकेत करी , सप्तमस्थान  !! 8 !!

  

Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली