ओळख नवम स्थानाची
6️⃣3️⃣
©️💢 ओळख नवम स्थानाची 💢
मी आहे, नवम भाव,
घेऊन येई, नशीब दैव,
नवम भाव, जणू नवनीत,
श्रेष्ठतम, सकल भावात, !! 1 !!
कोनामाजी, परमत्रिकोण,
अतिशुभकारी , भाग्यस्थान.
शुभ ग्रह असता,भाग्य सदनी,
मिळे सफलता, पूर्ण जीवनी, !! 2 !!
जनमान्य तें, जगत्मान्यता,
भाग्यस्वामी, भाग्यी असता,
भाग्येश वसे, जया ठायी,
नित्य फळे, ती शुभदायी, !! 3 !!
संचित तथा, पूर्व सुकृत,
हेच खरे, भाग्याचे स्रोत,
भाव असे, जरी बलवान,
मृत्तिकेचेही, होई सुवर्ण, !! 4 !!
परमार्थसुखाचे, भाग्यस्थान,
धार्मिकतेचे ,निज अधिष्ठान,
जपतप यात्रा, तीर्थादिक,
परदेशगमना, संधी सुरेख,!! 5 !!
गुरुकृपा अन, नातवंडे,
कलत्राची, अनुज- भावंडे,
मीचं दर्शवी, सुख तयाचे,
माहेरघर मी, उच्च विद्येचे, !! 6 !!
जन्घा अवयवा, मीच अधिपती,
असता शुभ, दिगंत कीर्ती,
जपमाळांतरी, मेरुमणी,
नवम भाव मी , मुकुटमणी, !! 7 !!
Comments
Post a Comment