ओळख दशम स्थानाची

 

6️⃣4️⃣

©️💢 ओळख दशमस्थानाची  💢

मी आहे,  दशमस्थान,
स्वभाव माझा, कर्मप्रधान,
उदित भागी, केंद्रा प्रमुख,
स्थान माझे, असे सुरेख  !!  1 !!

कामधंदा, आणि नोकरीं,
हीच माझी, ओळख खरी,
आवडीचा मी, सकल ग्रहांना,
सबल असता, सुफल  नाना  !! 2 !!

कार्य गौरवें, मान -सन्मान,
मीच आपणा, दैवें देईन,
गुडघा, वक्ष, मीच अधिपती,
पितृसुखासी, मला पाहती  !! 3 !!

राजकृपा ती, मजरुपें कळेल,
शुभत्व असता, जीवन फळेल,
राजकारणी, माझा भाव,
निःस्वार्थ कर्मे, होईल नाव  !! 4 !!
.
रूप मूर्त मी, पराक्रमाचे,
पद -पैसा-मान, क्षेत्र कीर्तीचे,
असेल माझी, कृपा जरी,
कीर्ती सुगंध तो, दिगंतरी  !! 5 !!

©️=पुंडलिक दाते, अकोला -
9421755299
✍ ज्योतिष्य विषयक माझे इतर लेख, माझ्या "Pundlik Date " या  फेसबुक प्रोफाइल  पेजवर उपलब्ध आहेत. जिज्ञासूंनी जरूर भेट द्यावी. 

Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली