ओळख व्यय भावाची
6️⃣6️⃣
©️💢 ओळख व्ययभावाची 💢
मी आहे, व्ययस्थान,
शुभ- अशुभ, गुणांची खाण,
देई दंड, सजा, बदनामी,
असेल जरी, अशुभ मी !! 1 !!
दुरलौकिक वा, बंदीवास,
लावी कलंक, चरित्रास,
वेळ,पत -पैसा, दवडी सारा,
या सकलांचे, वाजवी " बारा " !! 2 !!
वाम नयन तें, पाऊले दोन्ही,
क्षेम कुशलाचा, मीच धनी,
मोक्ष त्रिकोणी, मज बहुमान,
तीर्थयात्रादि , देशाटन !! 3 !!
परोपकाराचा, भाव जागवि,
व्ययभावाची, हीच थोरवी,
शुभत्व असता, जनकल्याणा,
मोक्षसाधनी, मिळे प्रेरणा !! 4 !!
शुभ ग्रह देती, कीर्ती सदा,
पापा पोटी, नुसत्या आपदा,
मजठायी शुक्र, असेल जरी ,
ऐहिक सुखे मग , नानापरी !! 5 !!
द्वादश भावाची, ऐसी महती,
कथियेली मी, अल्पमती, !
नोहे समग्र, हा केवल सार,
पद्य रूपे मी , केला सादर, !! 6 !!
अनावधाने, असतील त्रुटी,
जाणिवे या, होतो कष्टी !
नावीन्याचे, आले भरते,
करण्या रचना, " पुंडलिक दाते " !! 7 !!
Comments
Post a Comment