ओळख लाभस्थानाची
6️⃣5️⃣
©️💢 ओळख लाभस्थानाची 💢
नावच माझे, लाभस्थान,
सदा सर्वदा, लाभच देईन,
शुभ अशुभ, सर्वच काही,
भेद कुठलाहि , मानत नाही !! 1 !!
धनेशापोटी, देईल धन,
कष्टेश येता, करेल ऋण,
व्ययेश येता तर, नुकसान,
मम स्थानाचे, महिमान !! 2 !!
कान, पोट-या, वाम बाहू,
जावई सुना, थोरला भाऊ,
मित्रसुखहि , जाणावे जनी,
या सकल सुखांचा, मीच धनी !! 3 !!
धनभाव मी, दशमाचा,
लाभ देई, स्वकष्टाचा,
बंधन असे, सकल ग्रहातें,
लाभी येता, द्या लाभातें !! 4 !!
मी षष्ठाचा, षष्ठेश,
जाणीव ही, अतिविषेश,
लाभ देउनहि मज, दूषित मानती,
त्रिषडाय -त्रिकुटी, मजला गणती !! 5 !!
Comments
Post a Comment