सुलभतेने "नवांश "कसे ओळखाल

 


6️⃣9️⃣ 💢 सुलभतेने "नवांश " कसे ओळखाल ? 💢

▪️जन्मकुंडलीतील कुठला ग्रह,  कुठल्या नवांशात आहे,  हे सहजपणे कसे ओळखाल ?

💢 वर्गकुंडल्यात, नवमांश कुंडलीस,  अतिशय महत्वाचे स्थान आहे. जन्मकुंडलीत ग्रह, ज्या राशीत असेल त्याच राशीत,  जर तो नवमांश कुंडलीतहि  असेल, तर त्यास " वर्गोत्तम "असे संबोधण्यात येते. वर्गोत्तम ग्रह  फल देण्यास बलशाली मानल्या जातो. तसेच फलादेशाचा, सूक्ष्म विचार करण्यासाठी,   तो ग्रह कुठल्या नवांशात आहे, याचा विचार केला जातो.

💢 प्रत्येक राशीस,  एकूण 30 अंश असून, या 30 अंशाचे, समान 9 भाग केले असता, एक भाग, हा 3 अंश 20 कलांचा येतो. व या प्रत्येक भागावर,  एका विशिष्ट राशीचा,  अंमल असतो.

💢 त्यामुळे कोणता ग्रह,  कुठल्या नवांशात आहे, हे पहाण्यासाठी,  ज्योतिष शास्त्राच्या पुस्तकातून दिलेले,  नवांश कोष्टक,  पहावे लागते.

💢 पण समजा, हे नवांश कोष्टक उपलब्ध नसेल, तरिहि  स्मरणशक्तीच्या जोरावर,  आपण ते ओळखू शकतो.



💢 ते कसे ओळखायचे ?... त्यांची पद्धती पुढील प्रमाणे :

( अ )▪️आपल्याला माहीतच आहे की,  12 राशीची आपण, खाली तक्त्यात दर्शवल्यानुसार,  तत्वा नुसार,  विभागणी केलेली आहे.
▪️या विभागणी नुसार,  प्रत्येक गटास  जो क्षेपकांक दिलेला आहे, तो गटानुसार, आपल्याला मुखोद्गत करावयाचा आहे.
--------------------------------------------------
तत्व       राशीं                  क्षेपकांक
--------------------------------------------------
अग्नी -  1, 5, 9                     0
पृथ्वी -   2, 6, 10                  9
वायू
-    3, 7, 11                   6
जल -    4, 8, 12                   3

-------------------------------------------------
( ब ) प्रत्येक राशीच्या एकूण 30 अंशाचे  9 समान भाग,  खालील प्रमाणे केले जातात. 
--------------------------------------------------
भाग  अंशापासून -             अंशापर्यंत
-------------------------------------------------
1     0 अंश 0 कला        3 अंश 20 कला
2     3 अंश 20 कला      6 अंश 40 कला
3     6 अंश 40 कला    10 अंश
4   10 अंश                 13 अंश 20 कला
5   13 अंश 20 कला    16 अंश 40 कला
6   16 अंश 40 कला    20 अंश
7   20 अंश                23 अंश 20 कला
8  23 अंश 20 कला    26 अंश 40 कला
9  26 अंश 40 कला    30 अंश
---------------------------------------------------  

 .वरील (ब ) कोष्टकानुसार आपणास ज्या ग्रहाचे नवांश पहावयाचे आहे, तो ग्रह त्या राशीत किती अंशावर आहे, व ते अंश ( ब ) कोष्टकात कोणत्या "भागात "येतात, ते पहाणे महत्वाचे आहे.

💢आता वरील (अ ) व ( ब ) कोष्टकानुसार ,  नवांश कसे ओळखावे हे प्रत्येक तत्वाच्या,  एकेका राशीनुसार, उदाहरणाद्वारे आपण पाहू.

⚛️.उदा. रवि मेषेत  18 अंश  27 कला  आहे.
अग्नीराशीं क्षेपकांक = O  (अ ) नुसार
+
18 अंश 27 कला = 6 वा  भाग  (ब ) नुसार
म्हणून 0+6 = 6= रवि कन्या नवांशी आहे.

⚛️ चंद्र वृषभेत  25 अंश 20 कला  तर नवांश कोणता ?
पृथ्वीराशीं क्षेपकांक = 9 (अ ) नुसार +
25 अंश 20 कला = 8 वा भाग ( ब ) नुसार
= 9+8=17-12= 5 = सिह नवांशात येईल. (या ठिकाणी  17 ही संख्या 12 पेक्षा अधिक असल्याने 12 (एक राशीचक्र ) वजा केले  आहे.

⚛️. शुक्र तुला राशीत  28 अंशावर आहे.
वायुराशी क्षेपकांक = 6 (अ ) नुसार +
28 अंश = 9 वा  भाग  (ब ) नुसार
म्हणून 6+9=15-12=3 = शुक्र मिथुन नवांशी आहे.

⚛️ गुरु कर्केत 17अंश 10 कलावर आहे. तर तो कोणत्या नवांशात आहे.
जलराशी क्षेपकांक = 3 (अ ) नुसार +
17 अंश 10 कला =6 वा भाग (ब ) नुसार
म्हणून 3+6=9 = गुरु धनु या स्वनवांशी आहे.

💢 यात राशीचे तत्व कोणते ? त्यानुसार त्याचा क्षेपकांक कोणता ?  व ग्रहाचे राशीतील अंश 9 पैकी कोणत्या भागात मोडतात. या बाबी महत्वाच्या आहेत.

💢 ज्यांचा थोडाफार अभ्यास आहे, अशा ज्योतिषप्रेमी वाचकांसाठी,  ही नित्योपयोगी माहिती  आहे. थोडा सराव केल्यास,  ही पद्धत अंगवळणी पडेल. व कोष्टक पहाण्याची,  जरूर पडणार नाही.

                                         नवांश कोष्टक 


🔼 वरील लेखातील माझे विचार माझे  वाचन, अनुभव व मनन शक्तीवर आधारित आहेत.
ते,  आपणा सर्वाना,  अवगत व्हावे,  यासाठी हा लेखन प्रपंच आहे. 
🎯 लेख आवडल्यास तसे, " कॉमेंट्स बॉक्स " मध्ये  कळवावे. म्हणजे मला अधिक लिहिण्यास उत्तेजन लाभेल.  🙏🌺🌺🌺 




Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली