पत्रिका आपल्याशी बोलते कां?
4️⃣6️⃣
💢 पत्रिका आपल्याशी बोलते कां ? 💢
💢 वरील प्रश्न हा सर्वसामान्य ज्योतिष प्रेमी वाचकांसाठी नसून, जे नवागत ज्योतिषी आहेत, त्यांच्यासाठी आहे.
💢 कुठलीही निर्जीव वस्तू बोलू शकत नाही. पण पत्रिकेच्या बाबतीत, अलंकारिक भाषेत, पत्रिका बोलते, असेच म्हटले जाते.
💢 मात्र पत्रिकेस बोलते करण्यास, बरेच परिश्रम करावे लागतात. ती एक साधनाच आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
💢 नवीन अभ्यासकास तर फारच गोंधळल्या सारखे होते. कोण ग्रह, कुणाचा मित्र कुणाचा शत्रू, कोणती राशीं कुणाची, कोणत्या नक्षत्राची कोणती राशीं, नेमकी कोणत्या ग्रहाची उच्च - नीच रास कोणती, अशा अनेक प्रश्नांचे वादळ, त्याचे डोक्यात थैमान घालत असते. भरपूर सराव झाल्यानंतर, हळू हळू, हे वादळ शमते.
💢 यात नवीन असे काही नाही. पोहायला शिकायचे म्हणून पहिल्या दिवशी, पाण्यात उडी मारल्यानंतर, नाकातोंडात पाणी जाते, पण नंतर पोहणे येतेच ना ! तद्वतचं हे आहे.
💢 प्रत्येक ग्रहाचे राशीनुसार गुणधर्म, त्यावर होणा-या, इतर ग्रहाच्या दृष्टी प्रभावाची फळे, समजून घेण्यासाठी बराच काळ जातो. त्यात अभ्यास कसा करावा, याचे योग्य मार्गदर्शन लाभल्यास, थोडी लवकर प्रगती होते.
💢 खरे म्हणजे ही आपल्या जिद्ध व चिकाटीची परीक्षा असते. या अप्रत्यक्ष परीक्षेस, जो उत्तीर्ण झाला, त्याला हा ज्ञानपरिस प्राप्त झाला, असे म्हणता येईल.
💢 अर्थातच, हे एका दिवसाचे काम नाही.
💢 शाळा -कॉलेज मध्ये, आपण ज्या एकतानतेने अभ्यास करतो, तीच तळमळ असल्यास, 2-अडीच वर्षात, ब -याच संकल्पना आकलनसुलभ होतात. व त्या नंतर, जेव्हा पत्रिका हाती येते तेव्हा, ज्या ग्रहावर दृष्टी पडते, त्या विषयीचे चित्र डोक्यात तयार होते.
💢 पण चिकित्सक दृष्टी तेवढ्यावर, स्वस्थ बसू देत नाही. मनात जे शुभाशुभ चित्र तयार झाले, त्यास इतर ग्रहांकडूनही पुष्टी मिळते काय?, याचा वेध घेतला जातो. अजूनही दुसरी ग्रहस्थितीहि, त्यास पोषक वाटत असेल तर, मनःपटलावर उमटलेले धूसर चित्र, अधिक घट्ट व स्पष्ट होते. व त्यानंतर त्या ग्रहस्थितीवरून निर्माण झालेला अंदाज, आत्मविश्वासाने जाहीर केला जातो.
💢 याचाच अर्थ, पत्रिका आपल्या मुखाने बोलली, असा होतो.
💢 ज्योतिष्यशास्त्र हे गूढ शास्त्र आहे. जेव्हा हे गूढ उकलले जाते, तेव्हा पत्रिका बोलली, असे म्हटले जाते.यालाच जुने ज्योतिषी " आपल्याशी पत्रिका बोलली पाहिजे ". असे म्हणत असत.
💢 पण यासाठी अथक व भरपूर परिश्रम लागतात, हेही तितकेच खरे आहे.
Comments
Post a Comment